सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..
Satara News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशानाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या धावलेल्या नातवाचा आणि नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेळीला वाचवण्यासाठी मुलगा गेला, आजी वाचवायला गेली दोघांचाही दुर्दैवी मृत्यू
शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरेल
शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू
मार्जी गावातील काळेवस्ती परिसरात दुपारी दीडच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत पावलेल्या वृद्ध महिलेची ओळख मालन विलास काळे (वय 60) अशी पटली आहे. नातू सुजित युवराज काळे (वय 13) याच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेल्या होत्या. तेव्हा एका शेळीचा पाय वीजेच्या तारेत अडकून पडला होता. विद्युत प्रवास सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती.
शेळीला वाचवण्यासाठी मुलगा गेला, आजी वाचवायला गेली दोघांचाही दुर्दैवी मृत्यू
संबंधित दृश्य पाहून निरागस सुजित शेळीला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला, नंतर तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता. आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाशी झुंज देत होता. हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता, वाचण्यासाठी पुढे सरसावली. मात्र, दुर्दैवाने शॉक बसला, शेळीसह आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला.