पुढील काही दिवस 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

मुंबई तक

राज्यात सध्या मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांना मुसळधार पाऊस झोडपणार असल्याचा इशारा दिला आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Google CTA

राज्यात सध्या मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांना मुसळधार पाऊस झोडपणार असल्याचा इशारा दिला आहे. कोकणासह घाटमाथा परिसर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग होणार आहे. काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसचा ऑरेंज अलर्ट वर्तवला असून काही भागांत पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. 

शिवाय जुलैमध्ये मान्सूनचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. अशातच नागरिकांनी नदीकाठ, डोंगराळ भाग आणि समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच IMD आणि स्थानिर प्रशासनाच्या सूचनेचे पाल करावे लागणार आहे. मुंबईसह अनेक भागांत वाहतूक, रेल्वे आणि दैनंदिन जीवनावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.