'आईच्या गां%$ गेलं.. मारून पाठवणार तुम्हाला', संजय दिना पाटलांमध्ये एवढी मुजोरी आली कुठून?

मुंबई तक

'हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा.' असं वादग्रस्त विधान खासदार संजय दिना पाटील यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

where did sanjay dina patil get audacity to threaten journalists and hurl abuses right in front of police
संजय दिना पाटलांमध्ये एवढी मुजोरी आली कुठून?
google news

मुंबई: शिवसेना (शिंदे गट) पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे पत्रकारांशी केलेल्या अत्यंत शिवराळ, घाणेरड्या आणि मग्रूर वर्तनामुळे चर्चेत आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून निवडून आल्यानंतर अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पत्रकार संघटनांसह राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (25 जून) काही पत्रकार संजय दिना पाटील यांना सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत प्रश्न विचारण्यासाठी गेले असता त्यांनी संतप्त होत पत्रकारांनाच शिविगाळ केली. "तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा. तुम्ही उगाच माझ्या मागे लागलात. परत आलात तर मारून पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला जे करायचं ते करा," अशी अत्यंत मग्रूर भाषा त्यांनी वापरली. 

या कथित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून पत्रकारांशी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसंच एवढी मग्रुरी येते कुठून असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

ही पाहा संजय पाटलांची मग्रुरी

'बोललोय.. समोर जे आहे ते जाणार ना.. जे करणार, बघा.. जे करणार ते भोगणार. अरे भाई कशाला.. बस झालं ना.. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतो.. बोलणारच नव्हतो.. बोललो ना भाई आता, कशाला आता करतोय.. चल बस माझ्या बरोबर.. बस ना गाडीत.. जेवढं बोलायचं तेवढं बोलू चला.. कशाला? इज्जत देतो भाई घे ना यार.. कशाला'

हे वाचलं का?