बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव, मुंडे भाऊ बहीण आक्रमक; बीडचं खून प्रकरण काय?

मुंबई तक

vilas ghule murder case : केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे.

ADVERTISEMENT

vilas ghule murder case
vilas ghule murder case
google news

बातम्या हायलाइट

point

बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव

point

मुंडे भाऊ बहीण आक्रमक; बीडचं खून प्रकरण काय?

vilas ghule murder case : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास नवनाथ घुले (वय 27) यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. रविवारी दुपारी केज पोलीस ठाण्यासमोर तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : सियाच्या अशा गोष्टी की हादरुन जाल! केतनच्या आई-वडिलांनी काय सांगितलं?

चाकूने विलास घुले यांच्या पोटात वार

मिळालेल्या माहितीनुसार, विलास घुले आणि त्यांचा भागीदार आकाश चाळक हे बीड-केज राष्ट्रीय महामार्गावरील ‘गावकरी’ हॉटेल चालवत होते. शनिवारी सायंकाळी हॉटेलवर आकाश चाळक, उमेश माणे आणि आचारी गणेश प्रसाद शुक्ला उपस्थित होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या बाबासाहेब कदम, मंगेश कदम आणि रामेश्वर गायकवाड यांनी उमेश माणे याला अनैतिक संबंधांच्या कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश माणे पळून जाऊ लागल्याने त्याला वाचवण्यासाठी विलास घुले आणि नितीन घुले धावले. त्यानंतर आरोपींनी त्यांचाही पाठलाग केला. समर्थ बिअर बारसमोरील राष्ट्रीय महामार्गावर सर्वांनी विलास आणि नितीन यांना अडवून मारहाण केली. याचवेळी रामेश्वर गायकवाड याने सोबत आणलेल्या चाकूने विलास घुले यांच्या पोटात वार केला.

हेही वाचा : Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, विजांच्या कडकडाटासह मान्सून धुमाकूळ घालणार

हे वाचलं का?