सियाच्या अशा गोष्टी की हादरुन जाल! केतनच्या आई-वडिलांनी काय सांगितलं?
केतन अग्रवाल याच्या हत्येच्या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला अटक करण्यात आली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना केतनच्या कुटुंबियांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सियाच्या अशा गोष्टी की हादरुन जाल!
केतनच्या आई-वडिलांनी काय सांगितलं?
Ketan Agarwal Death : लोहगड किल्ल्यावरून 26 वर्षीय तरुण केतन अग्रवाल याचा धक्का देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केतनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. केतनचे कुटुंब उच्चशिक्षित आणि व्यावसायिक असून, केतनने अमेरिकेतून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. तो वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत होता. या घटनेमुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, केतनच्या आई-वडिलांनी या क्रूर कृत्याबद्दल तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले आहे.
याआधीही मारण्याचा प्रयत्न
केतनच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि केतनचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता, मात्र त्यानंतर अनेक संशयास्पद गोष्टी घडत होत्या. त्यांचा नियोजित बाली दौरा अचानक रद्द झाला, कारण फक्त केतनचाच पासपोर्ट चोरीला गेला होता, ज्यावर कुटुंबाला आता संशय येत आहे. यापूर्वी 31 मे रोजी ते लोहगडला गेले होते, त्यानंतर सियाने पुन्हा जाण्याचा हट्ट धरला. 14 जून रोजीच्या दुसऱ्या लोहगड भेटीदरम्यान सियाने केतनला धक्का देऊन दरीत पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण केतन झाडाचा आधार घेऊन वाचला. त्यावेळी तिने 'साप आला' असे सांगून नाटक केले होते. अखेर 18 जून रोजी वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त साधून तिने केतनला पुन्हा लोहगडला नेले, जिथे तिचा प्रियकर चेतन चौधरी आधीच दुचाकीवरून पोहोचला होता.
हे ही वाचा : Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, विजांच्या कडकडाटासह मान्सून धुमाकूळ घालणार
वार करुन खाली फेकले
सिया आणि चेतन या दोघांनी संगनमत करून केतनवर कोणत्यातरी वस्तूने वार केला आणि त्याला किल्ल्यावरून खाली फेकून दिले. यानंतर सियाने केतन खाली पडल्याचा बनाव करून कुटुंबियांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास चक्र फिरवले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
हे ही वाचा : Monsoon Update: अखेर ‘तो’ आला... मुंबईकर सुखावले, कुठे रेड आणि ऑरेंज अलर्ट?
कुटुंबाने 'ती' माहिती लपवली
अग्रवाल आणि गोयल कुटुंबाचे गेल्या 35 वर्षांपासूनचे जवळचे आणि स्नेहाचे संबंध होते, ज्यामुळे हा विश्वासघात अधिक वेदनादायी ठरला आहे. केतनच्या आई-वडिलांनी आरोप केला आहे की, सियाच्या प्रेमसंबंधांबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला पूर्ण कल्पना होती, तरीही त्यांनी ही माहिती लपवून लग्नाचा दबाव आणला. केतनच्या आईने सियाला स्वतःच्या सुनेसारखे मानले होते, मात्र तिने आणि तिच्या प्रियकराने केवळ स्वतःच्या सुखासाठी 26 वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला. पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून समाजात अशा क्रूर मानसिकतेला कडक संदेश जाईल.









