Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, विजांच्या कडकडाटासह मान्सून धुमाकूळ घालणार

मुंबई तक

Maharashtra Weather : काही दिवसांपासून मान्सूनने ब्रेक घेतला होता, मात्र आता जून महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यातील ठिकठिकाणी पुन्हा सक्रिय झालेला दिसून येत आहे. अशातच जाणून घ्या 24 जून रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मान्सून राज्यात ठिकठिकाणच्या भागांत पुन्हा सक्रिय

point

जाणून घ्या 24 जून रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : काही दिवसांपासून मान्सूनने ब्रेक घेतला होता, मात्र आता जून महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात ठिकठिकाणच्या भागांत पुन्हा सक्रिय झालेला दिसून येत आहे. राज्यातील मुंबईसह काही भागांत मंगळवारी पावसाने हजेरी लावली. संपूर्ण मराठवाडा छायेखाली असून 24 तासांत आणखी काही भागांत पावसाचा अदिकचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशातच जाणून घ्या 24 जून रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : भाच्याने आत्याचे पाय कापले, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला अन्..

कोकण 

कोकण विभागात 24 तासांत पावसाची अधिकची तीव्रता वाढणार आहे. पालघर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मान्सूनची शक्यता आहे. यामुळे सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पावसासह अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात मान्सूनने आगमन केले असून काही भागांत पावसाची हजेरी लागण्याची अधिकची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती दिसून येईल.