भाच्याने आत्याचे पाय कापले, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला अन्..

मुंबई तक

Crime News : कुटुंबाचा भाग मानणाऱ्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भाच्याने आत्याची हत्या केली. चांदीच्या बांगड्या आणि दागिन्यांसाठी जीव घेतला. आश्चर्याची बाब अशी की, हत्येनंतर भाचा आरोपी अनेक दिवस महिलेला शोधत असल्याचे नाटक करत कुटुंबासोबत राहिला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

भाच्याने आत्याचा खून केला

point

विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला

point

पुरावे नष्ट करण्यासाठी साडीला दगड बांधून विहिरीत फेकलं

Crime News : जयपुरच्या शिवदासपुरा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. कुटुंबाचा भाग मानणाऱ्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भाच्याने आत्याची हत्या केली. चांदीच्या बांगड्या आणि दागिन्यांसाठी जीव घेतला. आश्चर्याची बाब अशी की, हत्येनंतर भाचा आरोपी अनेक दिवस महिलेला शोधत असल्याचे नाटक करत कुटुंबासोबत राहिला होता, जेणेकरून कोणालाही याबाबत कसलाही संशय व्यक्त होऊ नये. मृत महिलेची ओळख बिना देवी (वय 54) अशी ओळख समोर आली. तसेच हत्या करण्यात आरोपीचे नाव सूरज बैरवा असे असून साथीदारप विनोद बैरवा याचा देखील समावेश आहे. 

हे ही वाचा : ओमराजेंनी प्रवेश करताच शिंदेच्या शिवसेनाचा मोठा निर्णय; राणा पाटील समर्थकांना धक्का

भाच्याने आत्याचा खून केला

जयपूर दक्षिण पोलिसांनी या खळबळजनक हत्या प्रकरणाचा छडा लावला असता, मृत आत्याच्या भाच्याला आणि त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले की, आरोपीवर लाखो रुपये कर्ज होते, त्याच्या आत्याकडे चांदी-सोन्याचे दागिने असल्याची त्याला माहिती मिळाली होती. याच लोभापोटी त्याने खून केला आणि नंतर मृतदेहाची ओळख लपवण्याच्या हेतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. पोलिसांसह तांत्रिक तपासातून हे प्रकरण उघडकीस आले. 

विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला

पोलीस उपआयुक्त राजर्षी राज यांनी सांगितलं की, 18 जून 2026 रोजी बराला गावातून वाहणाऱ्या धुंद नदीच्या परिसरातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली. बिना देवी 19 दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या त्याची तक्रार आधीच दाखल करण्यात आली होती. मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला होता. तपासातून असे उघडकीस आले की, महिलेचे दोन्ही पाय कापण्यात आले होते. 

हे ही वाचा : 13 वर्षीय मुलीच्या घरात तरुण घुसला, हात पाय बांधून जबरदस्ती..

पुरावे नष्ट करण्यासाठी साडीला दगड बांधून विहिरीत फेकलं

महिलेच्या पायातील पैंजण गायब झाले होते, मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या साडीला दगड बांधून खोल विहिरीत फेकून देण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे चोरी गलेल्या चांदीच्या बांगड्या, पीडितेचा मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरण्यत आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. 

हे वाचलं का?