भावजयीने दोन दिवस जेवण दिलं नाही, 16 वर्षीय मुलाने काय केलं?
Crime News : 16 वर्षीय मुलाने मोठा भाऊ, भावजय आणि तीन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जेवण न मिळणे, मानसिक तणाव आणि कौटुंबिक वाद यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक तपासात दावा करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भावजयीने दोन दिवस जेवण दिलं नाही
16 वर्षीय मुलाने काय केलं?
Crime News : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या मोठ्या भावाची, भावजयीची आणि तीन वर्षांच्या पुतण्याची झोपेत असताना हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्येचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या नऊ वर्षांच्या पुतणीने आरडाओरडा करत खोलीबाहेर धाव घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तिच्या आवाजामुळे घरातील वडील आणि आई जागे झाले. वडील मोठ्या मुलाच्या खोलीत पोहोचले असता तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर धाकटा मुलगा रक्ताने माखलेल्या धारदार शस्त्रासह खोलीतून बाहेर येताना दिसला.
"जेलमध्ये तरी जेवण मिळेल ना?"
घटनेनंतर आरोपी मुलगा घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन शांतपणे बसून राहिला. काही वेळाने वडिलांनी शेजारी आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वडिलांनीच धाकट्या मुलाने हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता आरोपी हातात गंडासा घेऊन जमिनीवर बसलेला आढळला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान हत्या का केली, असे विचारल्यावर आरोपी रडू लागला आणि भावजयीने दोन दिवस जेवण दिले नव्हते, म्हणून हत्या केल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना "जेलमध्ये तरी जेवण मिळेल ना?" असाही प्रश्न विचारला.
हेही वाचा : 'Operation Tiger देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनात झालं', भाजप आमदाराचा गौप्यस्फोट









