मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री, आक्षेपार्ह व्हिडिओ मित्रांच्या ग्रुपवर व्हायरल अन्..

मुंबई तक

Crime News : अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केले, या प्रकरणात सायबर पथकाने संबंधित आरोपीला ताब्यात घेत तक्रार दाखल केली. तसेच अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर केले आणि बाल संरक्षण गृहात देखील पाठवण्यात आले होते. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

point

व्हिडिओ व्हायरल केल्याचा कबुलीनामा 

Crime News : छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केले, या प्रकरणात सायबर पथकाने संबंधित आरोपीला ताब्यात घेत तक्रार दाखल केली. तसेच अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर केले आणि बाल संरक्षण गृहात देखील पाठवण्यात आले होते. 

हे ही वाचा : सुप्रिया सुळे यांचे जावई आहेत तरी कोण? पक्षीय बंधन तोडून रेवती सुळे थाटणार संसार

मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

घडलेल्या घटनेनुसार, 19 मे रोजी चक्रधर नगर परिसरात एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारीत नमूद केले की, एक मुलगा अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता,. डीएसपी सायबर उन्नती ठाकूर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएस 67-बी आयटी कायदा आणि पॉक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला.  

व्हिडिओ व्हायरल केल्याचा कबुलीनामा 

तपासादरम्यान, इंस्टाग्राम आयडीची ओळख तपासण्यात आली आणि इंस्टाग्राम चालवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला होता. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेणाऱ्या सायबर पोलिस ठाणे पथकाने चौकशी केली असता, त्याने मुलीशी मैत्री करून मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो विविध ग्रुपमध्ये शेअर केल्याचा कबुलीनामा दिला. 

हे ही वाचा : नवरा कामावर गेला, घरात बायको आणि प्रियकर एकत्रच अन्..

संबंधित घटनेत वापरण्यात आलेला फोन अल्पवयीन मुलाकडून जप्त करण्यात आला. दरम्यान अल्पवयीन मुलाला न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं, जिथून त्याला बाल संरक्षणगृहात पाठवण्यात आले.   

हे वाचलं का?