..अन्यथा 5 जुलै पासून उपोषण, आण्णा हजारेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

मुंबई तक

Anna Hazare ultimatum to Devendra Fadnavis : माहितीच्या अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. नियम रद्द न केल्यास 5 जुलैपासून राळेगणसिद्धीत बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

Anna Hazare ultimatum to Devendra Fadnavis
Anna Hazare ultimatum to Devendra Fadnavis
google news

बातम्या हायलाइट

point

..अन्यथा 5 जुलै पासून उपोषण,

point

आण्णा हजारेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

Anna Hazare ultimatum to Devendra Fadnavis, अहिल्यानगर : माहितीच्या अधिकारासाठी सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांनी महाराष्ट्रात 12 जून 2026 पासून लागू करण्यात आलेल्या ‘माहितीचा अधिकार नियम 2026’ विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र पाठवत हे नियम तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नियम मागे न घेतल्यास 5 जुलै 2026 पासून राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नव्या नियमांमुळे माहितीचा अधिकार कमकुवत होत असल्याचा दावा करत त्यांनी शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : नाशिक विधान परिषदः स्वतःची कोणतीही ताकद नसताना अपक्ष गीतेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा गेम ओव्हर, कोण आहे हा जायंट किलर?

अण्णा हजारे कोणत्या नियमांविरोधात करणार आंदोलन? 

12 जून 2026 पासून राज्यात लागू झालेल्या नव्या नियमांनुसार माहिती अधिकार अर्ज प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे ‘एक अर्ज – एक विषय’ ही अट. आता एका अर्जामध्ये एकापेक्षा अधिक विषयांबाबत माहिती मागवता येणार नाही. तसेच अर्ज 150 शब्दांच्या मर्यादेत लिहावा लागणार असून वेगवेगळ्या विषयांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावे लागतील. याशिवाय अर्जासोबत ओळखपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळखपत्र नसल्यास अर्ज परत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : 'अरे ये तो सिर्फ ट्रेलर है...', दाढी खाजवत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना खिजवलं! 'तो' पराभव अन्... नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?