ओमराजेंनी प्रवेश करताच शिंदेच्या शिवसेनाचा मोठा निर्णय; राणा पाटील समर्थकांना धक्का
Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राजकारणाला एक मोठा वेग आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कार्यकारिणीची बैठक बरखास्त
ओमराजे यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात मोठे बळ, पण..
धाराशिव: गणेश जाधव - खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राजकारणाला एक मोठा वेग आला आहे. ओमराजे यांच्या पक्ष प्रवेशानंतर अवघ्या काहीच तासांत जिल्ह्यातील शिवसैनिक, महिला शिवसैनिक आणि कार्यकर्ते संघटनांच्या सर्व विद्यमान कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा : 13 वर्षीय मुलीच्या घरात तरुण घुसला, हात पाय बांधून जबरदस्ती..
कार्यकारिणीची बैठक बरखास्त
अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कार्यकारिणीची बैठक बरखास्त करण्याचे आदेश दिले. अशातच आता प्रभारी जिल्हा प्रमुख अजित पिंपळे यांच्यासह सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांची पदे देखील रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी धाराशिव शहरात अजित पिंपळे यांनी धाराशिव शहरातील काही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची पदे नियुक्ती करण्यात आली. यामुळे पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार राणा पाटील हे त्यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. शिवसैनिकांकडून अनेकदा आमदार पाटील हेच जिल्ह्यातील शिवसेना गटाचे सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला. अशातच जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारी व एबी फॉर्म वाटप केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होतोय.
ओमराजे यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात मोठे बळ, पण..
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धाराशिवमधील संघटनात्मक बदलांबाबची चर्चा झाल्याची माहिती समोर आली. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात मोठे राजकीय बळ मिळाले असले, तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नव्या संघटनात्मक बांधणीचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा : नागपूर: 14 वर्षीय मुलासोबत मदरशात अनैसर्गिक कृत्य, इतर काही मुलं..
नव्या कार्यकारिणीबाबत जुने कट्टर शिवसैनिक व ओमराजे समर्थक यांचा योग्य तो समन्वय राखला जाईल दरम्यान, जिल्ह्यातील शिंदे सेनेची आगामी संघटनात्मक बांधणी आणि नवीन कार्यकारिणीची जबाबदारी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार तानाजीराव सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नव्या चेहऱ्यांसह जुन्या शिवसैनिकांना संधी देत संघटना अधिक बळकट करण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.









