बायकोच्या आजाराला वैतागला, नवऱ्याने शेवटी सगळंच संपवलं, काय घडलं?

मुंबई तक

एका व्यक्तीने पत्नीच्या आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. घराचा दरवाजा तोडून पोलीस आत शिरले असता त्यांना टीव्हीवर सुसाइड नोट दिसली. आंध्र प्रदेशमधील या घटनेत काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोच्या आजाराला वैतागला,

point

शेवटी सगळंच संपवलं,

point

काय घडलं?

Crime News : काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन चिमुरड्या मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दामू असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो व्यवसायाने कन्स्ट्रक्शन सुपरवायझर होता. त्याने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी घराच्या टीव्ही स्क्रीनवर एक सुसाइड नोट सोडली, ज्यामध्ये त्याने या गुन्ह्यामागचे अत्यंत वेदनादायी कारण स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

चौघांचं सुखी कुटुंब, पण...

दामू हा आपली 25 वर्षीय पत्नी निर्मला, मुलगा दिलीप आणि मुलगी श्रीविद्या यांच्यासोबत आनंदाने राहत होता. मात्र, काही काळापूर्वी त्याच्या पत्नीला मेंदूशी संबंधित एक अत्यंत गंभीर आणि असाध्य आजार झाला. दामूने तिच्या उपचारासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतु डॉक्टरांनी निर्मलाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगितले. आपल्या पत्नीला असह्य वेदनांमध्ये पाहणे दामूला सहन होत नव्हते, तसेच तिच्याशिवाय आपल्या मुलांचे भविष्य कसे असेल, या भीतीने त्याला ग्रासले होते. या मानसिक दडपणातूनच त्याने कुटुंबासह जीवन संपवण्याचा थरारक निर्णय घेतला.

हे ही वाचा : '...तेव्हा 5 लोकं मारलेली आम्ही', संजय दिना पाटलांचं धक्कादायक विधान, का बोलून गेले असं?

'त्या' रात्री काय घडलं?

सोमवारी (22 जून) रात्री दामूने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याने प्रथम आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना जेवणातून विष दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला असता, चारही जणांचे मृतदेह आढळून आले. तपासादरम्यान पोलिसांना टीव्ही स्क्रीनवर लिहिलेली दामूची सुसाइड नोट सापडली. यामध्ये त्याने या संपूर्ण घटनेला कोणीही जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले होते.

हे ही वाचा : 13 वर्षीय मुलीच्या घरात तरुण घुसला, हात पाय बांधून जबरदस्ती..

आमचे पैसे अंत्यसंस्कारासाठी वापरा

या सुसाइड नोटमध्ये दामूने आपल्या बँक खात्याचा एटीएम कार्ड नंबर, पिन आणि फोनचे डिटेल्स देखील लिहिले होते. त्यासोबतच, माझ्या बँक खात्यात असलेले पैसे आमच्या चारही जणांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात यावेत, अशी शेवटची विनंती त्याने केली होती. ही सुसाइड नोट पाहून पोलीसही अवाक झाले. सध्या स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. एका सुखी कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण चित्तूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?