Monsoon Update: अखेर ‘तो’ आला... मुंबईकर सुखावले, कुठे रेड आणि ऑरेंज अलर्ट?

मुंबई तक

Monsoon Rain Alert: मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो अखेर आला आहे. मान्सूनने मुंबईत (Monsoon in Mumbai) दमदार एन्ट्री केली असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

mumbai monsoon update 2026 monsoon finally arrives where are rain warnings issued imd alert for maharashtra 24 june 2026 weather
प्रातिनिधीक फोटो
google news

मुंबई: राज्यातील शेतकरी आणि नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला आहे. नैऋत्य मान्सूनने आता महाराष्ट्रातील सुमारे 75 टक्के भूभाग व्यापला असून उर्वरित भागातही पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक दिवस रखडलेल्या मान्सूनने आता वेग घेतल्यामुळे राज्यभर पावसाचे अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

रखडलेला मान्सून अखेर वेगात

जूनच्या पहिल्या दहा दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र कोकणात आल्यानंतर मान्सूनची वाटचाल मंदावली होती. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आवश्यक वातावरण निर्माण होत नसल्याने मान्सून पुढे सरकत नव्हता. आता मात्र दोन्ही बाजूंनी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सूनने पुन्हा वेग पकडला आहे.

सध्या विदर्भातील काही भाग वगळता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील बहुतांश भाग मान्सूनच्या प्रभावाखाली आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्येच मान्सूनची पूर्ण ताकद अद्याप पोहोचलेली नाही.

हे वाचलं का?