नागपूर: तिघांनी तरुणाचा गळा चिरला, रेल्वे रुळावर मृतदेह अन्..

योगेश पांडे

Nagpur Crime News : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालधक्का रेल्वे लाइन जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. संबंधित तरुणाची जूना वाद आणि पैशांच्या कारणातून तिघांनी हत्या केली. अटकेत असलेल्या आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

Nagpur crime
Nagpur crime
google news

बातम्या हायलाइट

point

माल धक्का परिसरातील रेल्वे लाइनजवळ तरुणाचा मृतदेह

point

तीन तरुणांनी मिळून केला खून

Nagpur Crime News : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालधक्का रेल्वे लाइन जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. संबंधित तरुणाची जूना वाद आणि पैशांच्या कारणातून तिघांनी हत्या केली. अटकेत असलेले आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चार लाख रुपयांच्या वादातून पीडित तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी राहुल उइके, परमेश्वर उर्फ पप्पू संतोष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. 

हे ही वाचा : आईच्या बॉयफ्रेंडनं तरुणीला संपवलं, मृतदेह भरलेली सुटकेस बाईकला...

माल धक्का परिसरातील रेल्वे लाइनजवळ तरुणाचा मृतदेह

या घटनेनं नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे क्षेत्रात एकच खळबळ उडाली. माल धक्का परिसरातील रेल्वे लाइनजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीची ओळख अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक अशी पटली आहे. तो शांतीनगर येथील लाल नगर परिसरातील रहिवासी होता. पोलिसांच्या तपासातून समोर आलं की, मृत व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

तीन तरुणांनी मिळून केला खून

प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरा झालेल्या वाद विवादातून कलमना क्षेत्रातील तीन तरुणांनी त्याचा गळा चिरला आणि नंतर घटनास्थळावरून फरार झाला. संबंधित घटनेची माहिती समजल्यास लकडगंज पोलिस आणि क्राइम ब्रांचने घटनास्थळी धाव घेतली. श्वानांच्या पथकाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली होती. नंतर तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे ही वाचा : मुलांच्या पायात साखळदंड आणि कुलूप, शरीरावर मारहाणीच्या खुणा; मदरशात..

मृत व्यक्तीवर यापूर्वी काही आरोप दाखल करण्यात आले होते, अशातच चार लाख रुपयांवरून हा वाद झाला होता. याच प्रकरणात रविवारी रात्री उशिराने दोन्ही गटात मोठा वाद उफळला होता. आरोपीने धारदार शस्त्राने अब्दुलची हत्या केली. आरोपींना चौकशीसाठी लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल केले. 

हे वाचलं का?