Maharashtra Weather : हवामानात उलटफेर, येत्या काहीच तासांत मान्सून धुमाकूळ घालणार; पण..
maharashtra weather : जून महिना संपत आला मात्र तरीही मान्सूनचा पत्ता नाही. राज्यात मान्सून सक्रिय राहणं अपेक्षित असून यंदा मान्सूनला हजेरी लावण्यात विलंब झाला आहे. अशातच जाणून घेऊयात 22 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील हवामानात मोठा उलटफेर
मान्सूनला हजेरी लावण्यास विलंब
Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठा उलटफेर जाणवू लागला आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय राहणार असल्याची शक्यता आहे. जून महिना संपत आला मात्र तरीही मान्सूनचा पत्ता नाही. राज्यात मान्सून सक्रिय राहणं अपेक्षित असून यंदा मान्सूनला हजेरी लावण्यास विलंब झाला आहे. अशातच जाणून घेऊयात 22 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : मोठी बातमी! अखेर ठरलं, ओमराजेंचा शिवसेनेत प्रवेश निश्चित
कोकण
कोकण विभागात मोठा बदल जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईसह काही ठिकाणी रविवारी पावसाने जोडपलं होतं, आता पुढाली काही दिवस मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह तुरळक पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि पुणे घाटमाथा परिसरात पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच रविवारी मान्सूनपूर्व पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. येत्या काहीच तासांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला मान्सून झोडपणार असून यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत वादळी पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. अशातच वातावरणात 25 जून पासून मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता अधिक आहे.









