ओमराजेंकडून एकनाथ शिंदेचं कौतुक, राणा पाटलांबाबतही भूमिका मांडली

मुंबई तक

Omraje Nimbalkar praises Eknath Shinde : . निकाल विरोधात गेल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तात्काळ गृहमंत्र्यांना बोलले, मला पाठबळ दिले, अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय.

ADVERTISEMENT

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
google news

बातम्या हायलाइट

point

ओमराजेंकडून एकनाथ शिंदेचं कौतुक

point

राणा पाटलांबाबतही भूमिका मांडली

Omraje Nimbalkar praises Eknath Shinde, धाराशिव, गणेश जाधव :  खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून शिवसेना शिंदे गटात जाणार असून ते लवकरच निर्णय जाहीर करू शकतात. कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. निर्णय झाला, घोषणा बाकी असून 'खिचके के ताण धनुष्यबाण' अशी स्तिथी आहे. ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. शिवाय, कार्यकर्त्यांनी पाठीशी उभे राहत साथ द्यावी, अशी विनंतीही केली. 

हेही वाचा : पुणे: आयशर टेम्पोनं दुचाकीला चिरडलं, चिमुरड्यासह दोघांचा दुर्दैवी अंत

पाटील कुटुंब सत्ता असेल तिकडं जातं - ओमराजे निंबाळकर 

ओमराजे निंबाळकर म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था निवडणुका लढवल्या मात्र त्यात यश आले नाही. सत्तेची व आर्थिक ताकत ही त्यांच्या सोबत (पाटील कुटुंब) आहे. आपण ज्यांना विरोध करण्यासाठी राजकारणात आलो ते काँग्रेस सरकार असताना तिथे होते, भाजप सरकार आले की तिथे आले आहेत, त्यांचं चालूच आहे. आपण कमी संसाधनात कुठेपर्यंत लढायचे? आपण सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमन केले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. बऱ्याच कार्यकर्त्यांसोबत माझी याची चर्चा झाली. 

हेही वाचा : किडन्या विकून 100 कोटी देऊ, पण पक्ष सोडू नका; ओमराजे निंबाळकरांना कोणी लिहिलं पत्र?

हे वाचलं का?