मोठी बातमी! अखेर ठरलं, ओमराजेंचा शिवसेनेत प्रवेश निश्चित

मुंबई तक

Omraje Nimbalkar : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे, त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. आज 21 जून 2026 रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
google news

बातम्या हायलाइट

point

''एकनाथ शिंदे यांच्या नेृतृत्वात आम्ही जाणार''

point

ओमराजे काय म्हणाले?

Omraje Nimbalkar : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे, त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज 21 जून 2026 रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहोत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.  

हे ही वाचा : किडन्या विकून 100 कोटी देऊ, पण पक्ष सोडू नका; ओमराजे निंबाळकरांना कोणी लिहिलं पत्र?

''एकनाथ शिंदे यांच्या नेृतृत्वात आम्ही जाणार''

ओमराजे म्हणाले की, 'स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठेही आम्हाला यश मिळालेलं नाही, चांगलं काम करूनही अगदी वाईट पद्धतीने उमेदवार पराभूत झाले. मी आणि कार्यकर्त्यांनी मिळून सामान्यांची कामे प्राणामिकपणे केली आहेत. आमचा कार्यकर्ता आणि आम्ही लोकांच्या कामासाठी कधीच मागे पडलो नाही. सत्तेसाठी आम्हाला या पराभवाला सामोरं जावं लागलं. आज सगळ्यांच्या माध्यमातून निर्णय घेतला की, आम्ही शिवसेना पक्षात जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेृतृत्वात आम्ही जाणार आहोत', असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

'आपण कुठपर्यंत दम काढायचा? पुढचा माणूस सगळ्या गोष्टीचा वापर करून सत्तेवर बसतोय, आपण उगाच वेड्यासारखं बघत बसतोय. आपण कुठपर्यंत हे सहन करायचं? भाजप शिवसेनेसह इतर 4 पक्ष चालवत आहेत, या सगळ्या बाबींचा विचार करावा लागेल, तसेच कार्यकर्त्यांची बिले देखील अडवली जात आहेत', असं ते म्हणालेत.  

नंतर त्यांनी पवनराजे हत्याकांड प्रकरणी भाष्य केलं होतं, गेली 20 वर्षांपासून कोणीच आरोपी नाही, सगळेच निर्दोष आहेत, कोर्ट म्हणतं की, राजकीय शत्रूत्व असून हे सगळे निर्दोषच सुटले. मी खासदार असताना देखील माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही इतरांचं काय होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

हे वाचलं का?