शिंदेंच्या शिवसेनेत येताच झटक्यात 'एवढ्या' कोटींचा निधी, ओमराजेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
omraje nimbalkar dharashiv development fund : शिवसेना (शिंदे गट) प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवसाठी 18 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाल्याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिंदेंच्या शिवसेनेत येताच झटक्यात 18 कोटींचा निधी
ओमराजेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
omraje nimbalkar dharashiv development fund : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना 18 कोटींचा निधी मंजूर झालाय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विकास निधीच्या मुद्द्यावरुन ठाकरेंची साथ सोडली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वीच स्पष्टपणे बोलून दाखवले होते. त्याचवेळी निधी मिळत नसल्यामुळे विकासकामांवर मर्यादा येत असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. आता शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिव शहरातील विविध विकासकामांसाठी तब्बल 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, विजांच्या कडकडाटासह मान्सून धुमाकूळ घालणार
ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट
धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय!
उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.









