संजय दीना पाटलांची पत्रकारांना धमकी, एकनाथ शिंदेंकडून सारवासारव
Eknath Shinde : शिंदे गटाचे फुटीर खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकरांशी बोलताना अपशब्द वापरले. त्यांच्या अपशब्दानंतर आणि पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरवासारव केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संजय दीना पाटील यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
संजय राऊत यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Eknath Shinde : इज्जत करतोय, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उभं करतोय जेवायला देतोय. आता परत जर आले तर मारून पाठवणार तुम्हाला. जे लिहायचं ते लिहा आणि जाऊन सांगा तिकडं, कमिश्नरकडे तक्रार करा. अनेक दिवस झालं सहन केलं, मग हा $#@&$ घुसताय?' असं लज्जास्पद वक्तव्य संजय दीना पाटील यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सारवासारव केली.
हे ही वाचा : 'परत आला तर मारुन पाठवणार...' खासदार संजय दीना पाटलांची पत्रकारांना थेट धमकी
संजय दीना पाटील यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकरांशी बोलताना अपशब्द वापरले. त्यांच्या अपशब्दानंतर आणि पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी संजय दीना पाटील यांच्यासोबत बोललो आहे. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली, की पत्रकारांबाबत चुकीची वक्तव्य करायची माझी अजिबातच इच्छा नव्हती. मी पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. जे रोज त्यांच्या विरोधात बोलतात. तोडून टाका, मारून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाचे निच मीडियासमोर शब्द वापरतात. हा मीडियाचा देखील अवमान आहे, याचा राग संजय दीना पाटील यांना आला'.
संजय राऊत यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे काय म्हणाले?
'आम्ही पत्रकारांवर कोणी लोकप्रतिनिधींनी बोलू नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की, पत्रकारांना काही चुकीचा शब्द गेला असेल, दिलगिरी व्यक्त करावी. संजय दीना पाटील यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या. जे लोक घराबाबत वक्तव्य करतात, हे अतिशय निंदणीय असून हे किती दिवस आहे. 2022 पासून अशी भाषा वापरली जातेय, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करायचा आहे का?', असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा : राष्ट्रवादीचे खासदार फुटणार? शरद पवारांनी एकाच वाक्यात सांगितलं, काय म्हणाले?
पुढे ते म्हणासे की, 'कोणत्या थराला जाऊन तुम्ही महाराष्ट्रातील संस्कृती रसातळाला घेऊन जाल. संजय दीना पाटील यांनी सांगितलं की, माझा पत्रकारांबाबत कोणताही वाद नाही. माझं काही बोलणं अनावधानानं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो', असं एकनाथ शिंदे म्हणाले.









