Exclusive Video: पुण्यातील कॅफेमध्ये बॉयफ्रेंड चेतनला बोलावलं, कॉफी पित थंड डोक्याने सियाने ठरवला गेम अन्..
Ketan Agrawal Murder : पुण्यातील लोहगड प्रकरणाने सारा देश हादरून गेला आहे. केतन अग्रवालच्या दुर्दैवी हत्येनंतर आता चेतनचे आणि सियाचे पुण्यातील कॅफेतील सीसीटीव्हीचे फुटेज समोर आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चेतन आणि सिया दोघेही पुण्यातील कॅफेत
केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचण्यात आला
Ketan Agrawal Murder : पुण्यातील लोहगड प्रकरणाने सारा देश हादरून गेला आहे. केतन अग्रवालच्या दुर्दैवी हत्येनंतर आता चेतनचे आणि सियाचे पुण्यातील कॅफेतील सीसीटीव्हीचे फुटेज समोर आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे हत्येच्या एका दिवसापूर्वी पुण्यातील कॅफेत भेटले होते, जिथं संपूर्ण कट रचण्यात आला होता.
हे ही वाचा : कल्याण: टोमॅटोचा बहाणा, 55 वर्षीय वृद्धानं 7 वर्षीय चिमुरडीला बंद दारआड..
चेतन आणि सिया दोघेही पुण्यातील कॅफेत
पोलिसांच्या तपासानंतर, चेतन आणि सिया दोघेही 17 जून रोजी सायंकाळी पुण्यातील थर्ड वेव्ह कॅफेत आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतेय की, सिया आणि चेतन हे दुपारी 4:35 वाजताच्या सुमारास निघून गेले. आता प्रश्न असा आहे की, त्या एका तासात काय घडलं असावं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचण्यात आला
तपास यंत्रणांनी दावा केला की, बैठकीत केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. पोलिसांनी मिळवलेल्या डिजिटल पुराव्यांवरून आणि चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीच्य आधारे, अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, ते दोघेही कॅफेत भेटले होते. तपासातून उघड झालं की, सिया ही घटनेपूर्वी युट्यूबवर लोहगड किल्ल्याचे व्हिडिओ पाहत होती. पोलिसांनी दावा केला की, तिने या ठिकाणाची माहिती चेतन चौधरीला दिला. ही माहिती एका कटाचा भाग असू शकते, असा तपास अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला.
पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही फुटेजचा तपासच केला नाही,तर त्यांनी मोबाईल फोन, चॅट रेकॉर्ड, इंटरनेट सर्चची हिस्ट्री आणि दोन्ही आरोपांनी केलेलं संभाषण याची तापासणी देखील केली. हा मोठा डिजिटल पुरावा आहे.









