कल्याण: टोमॅटोचा बहाणा, 55 वर्षीय वृद्धानं 7 वर्षीय चिमुरडीला बंद दाराआड..
Kalyan crime : कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. पोलीस ठाणे परिसरात तीन दिवसांपूर्वीच असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
55 वर्षीय वृद्धाकडून अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
घटनास्थळी तणावजन्य परिस्थिती
Kalyan Crime : कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. पोलीस ठाणे परिसरात तीन दिवसांपूर्वीच असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. चिमुरड्यांसह आता महिला देखील सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.
हे ही वाचा : संजय दीना पाटलांची पत्रकारांना धमकी, एकनाथ शिंदेंकडून सारवासारव
55 वर्षीय वृद्धाकडून अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
पीडित चिमुरडी आणि आरोपी दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील एकाच गावातील रहिवासी होते. आरोपीची ओळख जुमयी आली शेख (वय 55) अशी पटली आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून याच परिसरातील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता नराधमाने क्रूरतेची परिसीमा ओलांडली. चिमुरडीला टोमॅटो देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
घटनास्थळी तणावजन्य परिस्थिती
या घटनेची स्थानिकांना माहिती समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण करण्यात आले. अशातच संतापलेल्या नागरिकांनी या नराधमाला बेदम चोप दिला. अशातच कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हे ही वाचा : सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..
या घटनेची माहिती दूरवर पोहोचली असता, कल्याण पूर्व भागात प्रचंड तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. भाजप शिवसेना ठाकरे गट, मनसेसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. भर दिवसा महिला आणि मुलींवर सुरू असलेल्या या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तसेच महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतोय.









