Maharashtra Weather : राज्याला मान्सून झोडपणार, 'या' 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather : राज्यातील काही भागांत पावसाच्या सरींनी दमदार हजेरी लावली. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच 26 जून 2026 रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील विविध भागांत मान्सूनच्या सरींनी जोरदार हजेरी लावली
23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यातील काही भागांत पावसाच्या सरींनी दमदार हजेरी लावली. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तवला आहे. अशातच 26 जून 2026 रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : Exclusive Video: पुण्यातील कॅफेमध्ये बॉयफ्रेंड चेतनला बोलावलं, कॉफी पित थंड डोक्याने सियाने ठरवला गेम अन्..
कोकण
कोकण विभागात पावसाचा जोर कायम असून पालघर, ठाणे आणि मुंबईसह काही ठिकाणी विजांसह पाऊस दमदार हजेरील लावणार असल्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून पुणे, कोल्हापूर घाटमाथा पसिसर आणि सातारा घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.









