मुंबई लोकलमध्ये तरुणावर चाकू हल्ला, प्रवाशांमध्ये भीती, राग आणि संताप

मुंबई तक

मुंबई लोकलमध्ये बोरिवली स्थानकादरम्यान मयंक नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. हत्या करणाऱ्या आरोपीची राकेश सुवर्णा अशी ओळख पटली आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, मात्र याच मुंबई लोकलमध्ये झालेल्या एका तरुणाच्या हत्येनं प्रवासी हादरून गेले होते.

ADVERTISEMENT

Google CTA

मुंबई लोकलमध्ये बोरिवली स्थानकादरम्यान मयंक नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. हत्या करणाऱ्या आरोपीची रोशन सुवर्णा अशी ओळख पटली आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, मात्र याच मुंबई लोकलमध्ये झालेल्या एका तरुणाच्या हत्येनं प्रवासी हादरून गेले होते. या हत्येचं कारण देखील समोर आलं आहे. तरुण मयंक हा दरवाजाजवळ उभा होता, तेव्हा राकेश सुवर्णाने त्याला रेल्वेचा दरवाजा बंद करण्यास सांगितला होता.

यावरून मोठा वाद झाल्याने तरुणाच्या अंगावर रोशन सुवर्णाने चाकूने वार केले. अशातच आरोपी सुवर्णाला कुर्ला येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेनं लोकलचे प्रवाशी भयभीत झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांनी चिंता, भीती आणि राग व्यक्त केला आहे.