'तिला पण लोहगडावरुन ढकला' सियाच्या आई-वडिलांची हॉस्पिटलमधून मुलाखत

ओमकार वाबळे

पुण्याच्या केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये आता एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक वळण आले आहे. "जर माझी मुलगी दोषी असेल तर तिला लोहगडावरुन ढकला, अगदी फाशी दिली तरी चालेल," असे तिची आई पूजा गोयल आणि वडील प्रवीण गोयल यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

Ketan Agarwal Murder Case
Ketan Agarwal Murder Case
google news

बातम्या हायलाइट

point

'तिला पण लोहगडावरुन ढकला'

point

सियाच्या आई-वडिलांची हॉस्पिटलमधून मुलाखत

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समोर आलेली केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचे नाव सध्या तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि पोलीस तपासावर सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांनी आपली बाजू मांडली असून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

केतन अनेकदा घरी येत असे

प्रवीण गोयल यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे आणि केतनचे लग्न एका कौटुंबिक विवाह सोहळ्यात ठरले होते. आधी गोव्यात आणि नंतर कर्जत येथील एका लग्नात मध्यस्थांमार्फत केतनचे काका अमन अग्रवाल यांनी सियाबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी सियाचे वय अवघे 19 वर्षे असल्याने सुरुवातीला गोयल कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते, परंतु अग्रवाल कुटुंबाची प्रतिष्ठा पाहून त्यांनी या नात्याला होकार दिला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात एका हॉटेलमध्ये अत्यंत थाटामाटात दोघांचा साखरपुडा संपन्न झाला. दोन्ही कुटुंबे या नात्यामुळे अत्यंत आनंदी होती. केतन अनेकदा त्यांच्या घरी येत असे आणि तो आपल्याला मुलासारखा मान देत असे, असे प्रवीण गोयल यांनी सांगितले.

हे ही वाचा : Pune Metro : मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट, कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन

50 हजारांची खरेदी

दरम्यान, केतनच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांवर बोलताना सियाच्या पालकांनी सांगितले की, चेतन चौधरी नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ते ओळखत नाहीत आणि त्याचे नाव त्यांनी पहिल्यांदाच ऐकले आहे. केतनने त्याच्या वडिलांना (विशाल अग्रवाल) सियाचा फोन सतत बिझी येत असल्याचे सांगितले होते, यावर बोलताना प्रवीण गोयल म्हणाले की, जर असा काही प्रकार होता तर केतनच्या वडिलांनी आमच्याशी संपर्क साधून यावर चर्चा करायला हवी होती. सियाची आई पूजा गोयल यांनी स्पष्ट केले की, दोघेही एकमेकांसोबत खूप खूश होते. त्यांच्यात कोणतेही वाद नव्हते. लोहगड ट्रेकिंगला जाण्यापूर्वी सियाने केतनची आई राखी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलूनच परवानगी घेतली होती. तसेच, दोघांच्या प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्याची तयारी सुरू होती आणि त्यासाठी 50 हजार रुपयांची खरेदीही करण्यात आली होती. जर सियाला हे लग्न मान्य नसते, तर तिने लग्नाची खरेदी आणि तयारी आनंदाने केली नसती, असा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्याला मान्सून झोडपणार, 'या' 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

17 कोटींच्या महालाच्या अफवा

लग्नावरील अवाढव्य खर्चाच्या आणि चार्टर्ड फ्लाईट्सच्या चर्चांवर बोलताना प्रवीण गोयल यांनी सांगितले की, मीडियामध्ये येणाऱ्या 17 कोटींच्या महालाच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि अफवा आहेत. त्यांचा पिढीजात ड्रायफ्रूटचा व्यवसाय असून त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार 3 कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. उदयपूरमधील 'अनंता रिसॉर्ट'मध्ये 27,000 रुपये प्रति दिवस या दराने 70 रूम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि हा खर्च दोन्ही कुटुंबांनी मिळून केला होता. कोणतीही चार्टर्ड फ्लाईट बुक करण्यात आली नव्हती, केवळ प्रवासाच्या सोयीसाठी पुणे ते अहमदाबाद आणि तिथून कारने उदयपूरला जाण्याचे नियोजन सुरू होते.

हे वाचलं का?