Pune Metro : मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट, कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन
ketan agrawal murder case : लोहगडवरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येच्या आदल्या दिवशीच आरोपींनी कॅफेमध्ये बसून कट रचल्याचं तपासातून समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Pune Metro : मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट
कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन
ketan agrawal murder case : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक पुत्र केतन विशाल अग्रवाल यांच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं समोर आलंय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पुण्यातील लुलनगर परिसरातील एका कॅफेमध्ये जवळपास 55 मिनिटे बसून संपूर्ण कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कॅफेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे एकत्र बसून मोबाईलवर व्हिडिओ पाहताना, एकमेकांशी चर्चा करताना आणि लोहगडाशी संबंधित माहिती पाहत असल्याचे तपासात समोर आले आहे. याच भेटीत पुढील दिवसाच्या घटनांची आखणी करण्यात आली होती.
हेही वाचा : Personal Finance: AI मुळे कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम.. अशी करा आर्थिक तयारी, नाहीतर...
मोबाईलवर लोहगडाचे व्हिडिओ पाहिले
पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयलने यापूर्वीच लोहगड परिसराची रेकी केली होती. त्यानंतर तिने मोबाईलवर लोहगडाशी संबंधित माहिती आणि व्हिडिओ शोधल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कॅफेमधील भेटीदरम्यान दोघांनी मोबाईलवर लोहगडाचे व्हिडिओ पाहिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी दोघांमधील जवळीकही फुटेजमध्ये दिसून येत असल्याचे तपासातून समोर आले आहे. ही भेट केवळ सामान्य नव्हती, तर त्यामध्ये गुन्ह्याचा कट रचला गेला असावा, अशी शक्यता तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजला तपासात महत्त्वाचा पुरावा मानले जात आहे.
हेही वाचा : ठाकरेंचा सहावा खासदार फडणवीसांनी शिंदेंकडे कसा पाठवला? एक शब्द, अन्यथा...









