ठाकरेंचा सहावा खासदार फडणवीसांनी शिंदेंकडे कसा पाठवला? एक शब्द, अन्यथा...

निलेश झालटे

शिंदेंच्या शिवसेनेकडे पाच खासदार सहज गेले, मात्र सहावा खासदार जायला तयार नव्हता. अनेक प्रयत्न झाले पण या सहाव्या खासदाराची मनधरणी होत नव्हती. अखेर यामध्ये उडी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेंकडे आले, ठाकरेंना गेल्या चार वर्षात दुसरा मोठा धक्का शिंदेंनी दिला आहे. टायगरच्या नावानं झालेलं हे ऑपरेशन देशभरात गाजलं. मात्र, यादरम्यान महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सूत्रांची माहिती अशी आहे की, शिंदेंकडे पाच खासदार सहज गेले, मात्र सहावा खासदार जायला तयार नव्हता. अनेक प्रयत्न झाले पण या सहाव्या खासदाराची मनधरणी होत नव्हती. अखेर यामध्ये उडी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. फडणवीसांनी त्या सहाव्या खासदाराला शब्द दिला, जबाबदारीचं वचन दिलं आणि ठाकरेंचा गट अखेर फुटला.

‘ऑपरेशन टायगर’ची इनसाइड स्टोरी

‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कशी कामाला आली याचीच ही स्टोरी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा... तर सूत्रांच्या माहितीनुसार ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा तसं तर 2024 पासूनच सुरु आहे. याबाबत शिंदेंच्या नेत्यांकडून वारंवार हिंटही दिली जात होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण, माहिती अशी आहे की, जानेवारी, 2026 मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा मुद्दा सिरीयसली घेतला. ता गट फोडायचा म्हणल्यावर सहा खासदार फोडणं गरजेचं होतं.

हे ही वाचा>> केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सियाचा प्रियकर चेतन चौधरी नेमका कोण आहे?

हे खासदार फोडण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातत्यानं दिल्ली वाऱ्या केल्या. किमान पाच वेळा तरी भाजप श्रेष्ठींची भेट घेतली होती परंतु, खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत यावर निर्णय होत नव्हता, अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता सांगितलं असं जातंय की या सहापैकी बहुतांश खासदारांची इच्छा कमळ हाती घेण्याची होती. मात्र, खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये यावर काथ्याकूट झाल्यानंतर एप्रिलमध्ये ‘ऑपरेशन टायगर’करिता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंना ग्रीन सिग्नल दिला, अशी सूत्रांची माहितीय. शिंदेंनी आपल्या स्टाईलमध्ये पाच खासदारांना मनवलं पण सहावा गडी काय तयार होत नव्हता. मग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीसांना विचारणा झाली आणि याची जबाबदारीच त्यांना दिली गेली.

हे वाचलं का?