केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सियाचा प्रियकर चेतन चौधरी नेमका कोण आहे?

मुंबई तक

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. सिया आणि चेतनची ओळख कशी झाली, चेतन नेमका कोण आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Who Is Chetan Choudhari
Who Is Chetan Choudhari
google news

बातम्या हायलाइट

point

केतन अग्रवाल हत्या प्रकरण

point

सियाचा प्रियकर चेतन चौधरी नेमका कोण आहे?

 

Who Is Chetan Choudhari : लोहगडावर झालेल्या केतन अगरवाल हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणातील आरोपी आणि सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्याबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 23 वर्षीय चेतन चौधरी याने 'बीबीए'चे शिक्षण पूर्ण केले असून, त्याची घरची पार्श्वभूमी व्यावसायिक आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड भागात त्याच्या वडिलांचा म्हणजेच बाबूलाल चौधरी यांचा ड्रायफ्रूट्सचा मोठा व्यापार असून, गेल्या दीड-दोन वर्षांपासून चेतन स्वतः हा बिझनेस सांभाळत होता. याशिवाय त्याला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती आणि रणजी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. मृत केतन अग्रवाल याला सिया आणि चेतनच्या मैत्रीबद्दल माहिती होती, मात्र त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याची कोणतीही चुणूक त्याला लागली नव्हती.

प्रेमप्रकरणाची सुरुवात अन् हत्येचं प्लॅनिंग

सिया आणि चेतन यांची भेट एका दिवाळी पार्टीदरम्यान झाली होती आणि तिथूनच त्यांच्या प्रेम प्रकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. व्यापारी वर्ग असल्याने दोघांचेही कुटुंब मार्केट यार्ड भागातच व्यवसाय करत होते; सियाच्या वडिलांचा मसाल्यांचा व्यापार होता. एकाच भागात दुकाने असल्याने दोन्ही कुटुंबांची एकमेकांशी तोंडओळख होती आणि कौटुंबिक कार्यक्रमातही येणे-जाणे असायचे. दरम्यान, सियाच्या घरच्यांनी तिच्या विरोधाला न जुमानता केतन अगरवालसोबत तिचे लग्न ठरवून साखरपुडाही उरकला होता. पुढील काही दिवसांतच त्यांचे लग्न होणार असल्याने, सिया आणि चेतन दोघेही प्रचंड पॅनिक झाले होते. केतन हा आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे, लग्नाआधीच त्याला कायमचे संपवण्याचा कट या दोघांनी रचला. यासाठी त्यांनी कॅफेमध्ये बसून प्लॅनिंग केले आणि गुगलवरही हत्या कशी करावी, याबाबत सर्च केले होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचे खासदार फुटणार? शरद पवारांनी एकाच वाक्यात सांगितलं, काय म्हणाले?

लोहगडावर काय घडलं?

केतनने सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरला दोन्ही कुटुंबांसाठी एक सरप्राईज प्लॅन केले होते. मात्र, महाबळेश्वरला जाण्याच्या दोन दिवस आधी सियाने हट्ट करून केतनला लोहगडावर नेले होते. गडावर गेल्यावर सियाने केतनला कड्यावरून ढकलून देण्याचा पहिला प्रयत्न केला, पण सुदैवाने केतन एका झुडपात अडकल्याने तो प्लॅन फसला. त्यावेळी सियाने हुशारी दाखवत 'साप आला, साप आला' असे ओरडून केतनला मिठी मारली आणि भीतीपोटी तुला धक्का लागला असे सांगून स्वतःचा बचाव केला. या पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतरही त्यांनी हार मानली नाही. महाबळेश्वरला जाण्याच्या आदल्या दिवशी, वडिलांचा विरोध असतानाही सियाने पुन्हा एकदा लोहगड ट्रॅकचा हट्ट धरला आणि केतनला सोबत घेऊन गेली. यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेला चेतन चौधरी हा देखील गडावर पोहोचला.

हे वाचलं का?