सिया वारंवार मागे वळून पाहायची, पोलिसांना तिथेच संशय आला, CCTV मध्ये काय दिसलं?
केतन अग्रवाल हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती लागलेला महत्त्वाचा पुरावा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. केतनसोबत लोहगडावर जाताना सिया वारंवार मागे वळून बघत इशारे करत होती. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. या फुटेजमध्ये पोलिसांना काय दिसलं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिया वारंवार मागे वळून पाहायची
पोलिसांना तिथेच संशय आला
CCTV मध्ये काय दिसलं?
Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी दोघांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 18 जून रोजी लोहगडावरुन 400 फूट दरीत ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हातात अनेक धक्कादायक पुरावे लागले. यामधील महत्त्वाचा पुरावा म्हणजे लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज. या फुटेजवरुनच पोलिसांचा संशय बळावला आणि चेतन चौधरीदेखील या हत्येत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या फुटेजमध्ये पोलिसांना काय दिसलं, जाणून घेऊया.
हुडी, हेडफोन आणि शॉर्ट्स
21 जून रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांचे एक पथक लोहगड किल्ल्यावर तपासासाठी गेले होते. पोलिसांनी सर्वात आधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकीट काउंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, जिथून किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. या फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले असता, पोलिसांना केतन आणि सिया यांच्या अगदी जवळ वावरणारा एक संशयित तरुण आढळून आला. कडक उन्हाचा दिवस असतानाही त्या तरुणाने त्याचे तोंड लपवण्यासाठी हुडी घातलेली होती, त्यावर हेडफोन लावले होते आणि पायात शॉर्ट्स घातलेली होती. या संशयास्पद हुडीवाल्या व्यक्तीमुळे तपासाची दिशा बदलली.
हे ही वाचा : चेतनच्या वडिलांचा सियाविषयी धक्कादायक दावा, काय म्हणाले?
सिया वारंवार मागे वळून का बघत होती?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आणखी एक अत्यंत धक्कादायक गोष्ट दिसून आली, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. किल्ल्यावर जात असताना सिया गोयल दर दोन ते तीन मिनिटांनी मागे वळून या हुडी घातलेल्या तरुणाकडे पाहत होती आणि त्याला काहीतरी इशारे करत होती. या फुटेजमध्ये असे दिसून आले की, सियाने तिचा हात चेहऱ्याजवळ नेऊन या हुडीवाल्या तरुणाला इशारा केला. त्यानंतर त्या तरुणानेही तिच्या या इशाऱ्याला प्रतिसाद दिला. हा हुडी घातलेला तरुण दुसरा कोणी नसून सियाचा प्रियकर चेतन चौधरी होता.
हे ही वाचा : सिनेमाला लाजवेल असा कट रचला, बॉयफ्रेंडकडे सारखा 'तो' हट्ट करणे जीवावर बेतले!
'असा' अडकला चेतन
चेतनने किल्ला चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी घेतलेला अत्यंत कमी वेळ या कारणामुळे देखील पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, चेतनने अवघ्या 48 मिनिटांत लोहगड किल्ला चढून आणि उतरून पूर्ण केला होता. सामान्यतः किल्ला चढण्यासाठी 25 मिनिटे आणि उतरण्यासाठी 15 मिनिटे लागतात, याचा अर्थ तो किल्ल्यावर केवळ 8 ते 10 मिनिटेच थांबला होता. 'एवढ्या मोठ्या ऐतिहासिक किल्ल्यावर ट्रेकिंग करून जाणारी व्यक्ती तिथे अवघी 8 ते 10 मिनिटेच का थांबेल?' यामुळेच चेतन पकडला गेला. याच 10 मिनिटांच्या कालावधीत केतनला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. या भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.









