चेतनच्या वडिलांचा सियाविषयी धक्कादायक दावा, काय म्हणाले?
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याच्या वडिलांनी धक्कादायक दावा केला आहे. सिया आणि चेतनच्या संबंधांविषयी माहिती नसल्याचे चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिया आणि चेतनच्या संबंधांविषयी वडिलांचा धक्कादायक दावा
काय म्हणाले?
Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. केतनची होणारी बायको सिया गोयलने केतनला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली. सुरुवातीला हा एक अपघात असावा असे वाटले होते. मात्र सत्य कळताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. ही हत्या करण्यात सियासोबत तिचा प्रियकर चेतन चौधरी देखील सहभागी असल्याचे समोर आले. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चेतनचे वडील काय म्हणाले?
दरम्यान, अटक झाल्यानंतर चेतन चौधरी याचे वडील बाबूलाल चौधरी त्याला भेटायला आले असता चेतनच्या अश्रूंचा बांध फुटला. याविषयी बाबूलाल चौधरी यांनी सांगितले की, 'चेतनने मला रडत-रडत सांगितले की ही घटना घडली त्यावेळी मी लांब उभा होतो. सिया आणि केतन हे जवळ जवळ उभे होते.' यापुढे बोलताना ते म्हणाले की, 'चेतनला या प्रकरणात अडकवले जात आहे.' चेतन आणि सिया यांच्यात नेमके काय संबंध होते किंवा त्यांचा संपर्क कधीपासून होता, याविषयी आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचा दावा चेतनच्या वडिलांनी केला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : छत्र्या काढा रे, राज्यात पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
पोलीस तपासात काय?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीत केतन आणि सियामध्ये 2004 कॉल्स झाले होते. दोघं जवळपास 238 तास फोनवर बोलले असल्याचंही तपासात निष्पन्न झालं. यावरुन पोलिसांचा चेतनवर संशय बळावला. तसेच, पोलिसांनी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये केतन आणि सिया एकत्र चालताना दिसत होते. तर मागे हुडी घातलेला एक तिसरा माणूसही दिसत होता. एका क्षणी, सिया मागे वळून पाहताना दिसते, तर तो माणूस अचानक खाली बसतो. त्या दिवशी तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस होते. उष्णता असूनही कोणीतरी हुडी घातली होती, हे पोलिसांना संशयास्पद वाटले.
हे ही वाचा : बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी, दोघांनी मिळून केला कुटुंबातील तिघांना मर्डर
सियाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
केतनच्या मृत्यूनंतर सियाने इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. यामध्ये तिने लिहिलं होतं की, 'माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच तू मला सोडून गेलास. आपण लग्नाच्या इतक्या जवळ आलो होतो, तेव्हाच तू मला सोडून का गेलास? तू माझ्यासोबत असं का केलंस, हे मला अजूनही समजत नाहीये. मी अनेक स्वप्नं पाहिली होती. माझं तुझ्यावर एवढं प्रेम असताना तू मला का सोडून गेलास? तुझ्या आत्म्याला शांती लाभो.'









