'तू मला सोडून का गेलास?' केतनची हत्या केल्यानंतर सियाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

मुंबई तक

केतन अगरवालच्या मृत्यूनंतर त्याच्या होणाऱ्या पत्नीने, सिया गोयलने, केलेली इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये तिने नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Ketan Agarwal Murder Case
Ketan Agarwal Murder Case
google news

बातम्या हायलाइट

point

'...तेव्हाच तू मला सोडून का गेलास?'

point

केतनची हत्या केल्यानंतर सियाची इन्स्टाग्राम पोस्ट

point

काय लिहिलं?

Ketan Agarwal Murder Case : लोहगडावर घडलेली घटना अपघाती नसून एक सुनियोजित कटकारस्थान असल्याचे आता उघडकीस आले आहे. केतनच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची होणारी पत्नी सिया हिने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली होती. "तुझं माझ्यावर एवढं प्रेम होतं, मग मला सोडून का गेलास?" असा भावनिक प्रश्न तिने या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला होता. तिच्या या पोस्टमुळे सुरुवातीला सर्वांनाच धक्का बसला आणि तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात होती. मात्र, पोलिसांनी तपास लावताच या संपूर्ण प्रकरणामागचे धक्कादायक आणि क्रूर वास्तव समोर आले असून, ही निव्वळ एक आत्महत्येची किंवा अपघाताची घटना नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आधीही केला होता मारण्याचा प्रयत्न

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतनशी लग्न ठरण्यापूर्वी सियाचे चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. लग्न ठरल्यानंतरही तिचे जुने प्रेमसंबंध संपले नव्हते, ज्यातूनच तिने पती केतनला कायमचे संपवण्याचा कट रचला. या कटाचा पहिला प्रयत्न तिने 14 जून रोजीच केला होता, जेव्हा ती केतनसोबत लोहगडावर गेली होती. त्या दिवशी सियाने केतनला गडावरून थेट खाली ढकलून दिले होते. परंतु, सुदैवाने तो एका मोठ्या झुडपामध्ये अडकल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला होता. त्या वेळी आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिने तिथे अचानक साप आल्याचा खोटा बनाव रचून सर्वांची दिशाभूल केली होती.

हे ही वाचा : धाराशिव ग्राऊंड रिपोर्ट : टेंडरचे खेळ, निधीचं गणित आणि राजकारणातील 'लक्ष्मीदर्शन'

पोस्टमध्ये काय म्हटलं?

पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही सियाच्या डोक्यातील हत्येचा डाव थांबला नाही. अखेर तिने केतनची हत्या करून आपला जुना मार्ग मोकळा केला. विशेष म्हणजे, या क्रूर कृत्यानंतर लोकांच्या नजरेत स्वतःला निष्पाप दाखवण्यासाठी तिने सोशल मीडियावर दुःखाचे नाटक केले. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच तू मला सोडून गेलास. जेव्हा आपण लग्नाच्या इतक्या जवळ आलो होतो, तेव्हाच तू मला सोडून का गेलास? तू माझ्यासोबत असे का केलेस, हे मला अजूनही समजत नाहीये. मी अनेक स्वप्ने पाहिली होती. माझं तुझ्यावर एवढं प्रेम असताना तू मला का सोडून गेलास? तुझ्या आत्म्याला शांती लाभो.'

हे ही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेत येताच झटक्यात 'एवढ्या' कोटींचा निधी, ओमराजेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

सिया आणि तिच्या प्रियकराला अटक

सियाच्या या भावनिक पोस्टमागे तिने केलेल्या गुन्ह्याचे काळे सत्य दडले होते, जे आता पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहे. केतनच्या मृत्यूचे खोटे दुःख साजरी करणारी आणि 'साप आला' असा बनाव रचणारी सिया आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळजनक वातावरण निर्माण केले असून, प्रेमाच्या नावाखाली जीव घेणाऱ्या या  कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता या प्रकरणात चेतनच्या भूमिकेचा आणि संपूर्ण कटाचा पुढील तपास करत आहेत.

हे वाचलं का?