Pune Metro : बालीची ट्रिप, लोहगडावर प्रीवेडिंग शूट आणि क्रिकेटर बॉयफ्रेंड...

मुंबई तक

ketan Agrawal lohagad murder case : लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, केतन अग्रवालचा मर्डर झाल्याचं आता समोर आलंय. पोलिस तपासात होणाऱ्या बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर गंभीर आरोप समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

Pune Metro
Pune Metro
google news

बातम्या हायलाइट

point

Pune Metro : बालीची ट्रिप, लोहगडावर प्रीवेडिंग शूट आणि क्रिकेटर बॉयफ्रेंड...

point

बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर गंभीर आरोप

 

Pune Metro : लग्नाच्या तयारीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू आणि त्यामागे उलगडत गेलेले कटकारस्थान यामुळे पुणे हादरले आहे. 25 वर्षीय केतन अग्रवाल आणि 20 वर्षीय सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता आणि दोघांचे लग्नही निश्चित झाले होते. कुटुंबीयांच्या उपस्थितीत भविष्यासाठी प्लॅनिंग केलं जात होतं. त्याच दरम्यान बाली ट्रिपचा एक प्रसंग घडला होता. प्रवासासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर सियाने स्वतःचा पासपोर्ट फाडून टाकल्याचा तपासात उल्लेख आहे. त्यामुळे संपूर्ण ट्रिप रद्द झाली आणि सर्वजण पुण्यात परतले. या घटनेनंतरही लग्नाच्या तयारी सुरू राहिल्या. दोन्ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रतिष्ठित असल्याने लग्न सोहळाही शाही थाटात होणार होता. मात्र या नात्याच्या आड एक वेगळीच कथा सुरू होती, ज्याचा शेवट एका भीषण गुन्ह्यात झाल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : Monsoon Update: अखेर ‘तो’ आला... मुंबईकर सुखावले, कुठे रेड आणि ऑरेंज अलर्ट?

लोहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेल्यानंतर थंड डोक्याने मर्डर 

तपासानुसार सिया गोयल आणि 22 वर्षीय चेतन चौधरी यांचे प्रेमसंबंध होते. दिवाळीच्या सुमारास दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. मात्र दरम्यान सियाचे लग्न केतन अग्रवाल याच्याशी ठरले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधांमधील अडथळा ठरत असल्याची भावना दोघांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातूनच कट रचल्याचा आरोप आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेलेल्या भेटीदरम्यान केतनला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर पुन्हा एकदा प्री-वेडिंग शूटच्या निमित्ताने लोहगडला जाण्याचा बेत आखण्यात आला. 18 जून रोजी सिया आणि केतन किल्ल्यावर गेले असताना चेतन चौधरी आधीच तेथे पोहोचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

हे वाचलं का?