40 दिवसांपूर्वी लग्न, नवविवाहितेचा भयंकर शेवट, नेमकं काय घडलं?

Crime News : लग्नाला अवघे 40 दिवस झाले असताना नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने विशाखापट्टणममध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

40 दिवसांपूर्वी लग्न

point

नवविवाहितेनं भयंकर शेवट, नेमकं काय घडलं?

Crime News : ज्या घरात अवघ्या दीड महिन्यापूर्वी विवाह सोहळा थाटात पार पडला होता, त्याच घरात आता नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे. पीएम पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरएच कॉलनीमध्ये 25 वर्षीय आंध्रपु कृष्णवेणी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिच्या लग्नाला अवघे 40 दिवस झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : 'राजा राजा असतो, प्रजा प्रजा असते' फेसबुक लाइव्ह करत मर्डरची माहिती, काय आहे प्रकरण?

दोघेही करायचे नोकरी, आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णवेणी हिचा विवाह 13 मे 2026 रोजी विजयनगरम जिल्ह्यातील मेंटाडा परिसरात राहणाऱ्या आंध्रपु मुरली याच्याशी झाला होता. दोघेही नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. विवाहानंतर हे नवविवाहित जोडपे विशाखापट्टणममध्ये राहू लागले. मुरली एका खासगी कंपनीत नोकरी करत होता, तर कृष्णवेणी गोपालपट्टणम परिसरातील एका दुकानात काम करत होती. गेल्या सुमारे 20 दिवसांपासून हे दोघे पीएम पालम परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे सांगितले जात असतानाच बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

हेही वाचा : समजून घ्या: ठाकरेंच्या खासदारांनंतर आता नंबर नगरसेवकांचा? निधी वाटपातला भेदभाव पाहा!

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

मुरली ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्याला पत्नी कृष्णवेणी घरातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. हा प्रकार पाहून त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एसीपी अप्पलाराजू आणि सर्कल इन्स्पेक्टर बालकृष्ण घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले तसेच परिसरातील नागरिकांकडून चौकशी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात मृत्यूमागचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून प्रकरणाची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सर्कल इन्स्पेक्टर बालकृष्ण यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणातील सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांसह तिच्या पतीचीही चौकशी केली जात असून या घटनेमागील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लग्नाला अवघे 40 दिवस झाले असताना नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा आत्महत्येचा प्रकार आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.