लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, नवरी मुलीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, अश्लील फोटो अन्..
Crime News : घरात लग्नसोहळ्याची तयारी सुरू असताना नवरी मुलीसह आई-वडिलांनी जीवन संपवलं. कुटुंब हे मुलीच्या लग्नाची तयारी करत असताना, ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. एका झटक्यात तिघांचा जीव गेला, जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लेकीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
आजच्याच दिवशी विवाह होणार होता
Crime News : घरात लग्नसोहळ्याची तयारी सुरू असताना नवरी मुलीसह आई-वडिलांनी जीवन संपवलं. कुटुंब हे मुलीच्या लग्नाची तयारी करत असताना, ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. एका झटक्यात तिघांचा जीव गेला, जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. एका तरुणाने मुलीचे काही खासगी फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याची माहिती समोर आली. हा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात घडला होता.
हे ही वाचा : केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!
लेकीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
फोटो लीक झाल्यानंतर मुलीचे लग्न कार्य सुरू असलेल्या घरात मोठा वाद झाला होता. तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद झाला होता. या संपूर्ण घटनेनं मुलगी आणि तिचे आई-वडील व्यथित झाले. सोमवारी, लग्नाच्या काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय तरुणीने आणि तिच्या आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं.
आजच्याच दिवशी विवाह होणार होता
पोलिसांच्या माहितीनुसार, उल्लास गौडा नावाच्या एका तरुणाचे तरुणीवर प्रेम होते, त्याने तिला लग्नाची मागणी केली होती. उल्लास गौडाने पीडित तरुणीचा छळ केला. तसेच आई-वडिलांवर लग्नासाठी अनेकदा दबाव आणू लागला होता, परंतु मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. उल्लास गौडा अत्यंत अस्वस्थ झाला होता. मुलीचा साखरपुडा झाला असता, आज 24 जून रोजी तिचा विवाह होणार होता.
हे ही वाचा : बीड: 16 वर्षीय मुलगी दळण आणायला गेली, रस्त्यात गाठून खोलीत नेलं अन् दोनदा..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जूनच्या रात्री मुलीच्या पालकांनी उल्लास गौडा आणि आई-वडिलांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले. त्याला पीडितेचे काही खासगी फोटो हटवण्यास सांगितले. गौडाने काही फोटो स्वत:कडे ठेवले होते. घरी परतल्यानंतर लगेचच त्याने ते फोटो मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले, असा आरोप करण्यात आला. यामुळे नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय संतापले. ते तात्काळपणे घरी गेले आणि प्रकरण अधिकच चिघळू लागलं. नाते तुटल्यानंतर वधू आणि कुटुंबीय तणावाखाली आले.









