केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!
Pune crime : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन विशाल अग्रवाल (वय 26) यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मृताच्या केतनच्या आई वडील या घटनेनं पूरते हादरून गेले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणात केतनच्या वडिलांनी आरोप केला की, त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलाच्या हत्येचा पहिला प्रयत्न
तरुणाला तरुणीनं किल्ल्यावरून ढकलून दिलं
Pune crime : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन विशाल अग्रवाल (वय 26) याच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मृत केतनचे आई वडील या घटनेनं पूरते हादरून गेले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणात केतनच्या वडिलांनी आरोप केला की, त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला. होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा या प्रकरणात कथितरित्या समावेश होता. ते भावूक झाले आणि म्हणाले की, जर सिया लग्नासाठी तयार नव्हती तर तिने नकार द्यायला होवा होता, माझ्या मुलाचा जीव घेण्याची काय गरज होती? असा प्रश्न केला.
हे ही वाचा : बीड: 16 वर्षीय मुलगी दळण आणायला गेली, रस्त्यात गाठून खोलीत नेलं अन् दोनदा..
मुलाच्या हत्येचा पहिला प्रयत्न
केतनचे वडील, विशाल अग्रवाल यांनी दावा केला की, त्यांच्या मुलाच्या हत्येचा पहिला प्रयत्न 14 जून रोजी झाला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते, तिथे ते दोघेच होते. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, सियाने केतनला मागे ढकलले. त्याचदरम्यान केतन दोरीच्या दिशेने घसरला. मात्र परिस्थिती सामान्य वाटावी यासाठी सियाने लगेचच साप, साप अशी आरडाओरड केली. केतनला आपणच वाचवण्याचा तिने केवळ प्रयत्न केल्याचा बनाव केला. कुटुंबीयांनी आरोप केला की, हत्येचा पहिला प्रयत्न 14 जून रोजी झाला होता, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
तरुणाला तरुणीनं किल्ल्यावरून ढकलून दिलं
सिया ही बऱ्याच काळापासून त्याच्या हत्येचा कट रचत होती. एका व्हिडिओत केतन सियाचा वाढदिवस साजरा करताना दिसतो. तो तिला गाडीतून एका अलीशान गाडीतून घ्यायला येतो, गुलाबाची चादर पसरलेली दिसून येते. केतन तिला डेटवर घेऊन जातो, तिथे ते लाईव्ह गाण्यावर नाचतात. हा सर्व सोहळा वाढदिवसापूर्वीचा होता. त्याला 19 जून रोजी तिचा वाढदिवस आणखी खास बनवायचा होता. तो तिला मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेला, त्याने सियाला अनेकदा खूश करण्यासाठी मोठी तयारी देखील केली होती. मात्र, सियाच्या मनात भलतंच काहीतरी आलं. सियाने तिचा प्रियकर चेतनसोबत मिळून केतनला किल्ल्यावरून दरीत ढकललं, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : 'तू मला सोडून का गेलास?' केतनची हत्या केल्यानंतर सियाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
सिया आणि केतनचा विवाह पुढील महिन्यात जयपूरमध्ये होणार होते, दोन्ही कुटुंब लग्नाबाबत खूप उत्सुक होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सोहळ्यासाठी जयपूरमध्ये एक अलिशान महाल बुकींग करण्यात आला होता. पाहुण्यांच्या येण्या-जाण्यासाठी दोन चार्टड विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, लग्न सोहळा सुरू असताना केतनच्या आकाली मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेनं कुटुंबासह जवळचे मित्र देखील शोकाकुल होते.









