मंत्र्याच्या भाच्यासोबत मुलीचे प्रेमसंबंध, विद्यार्थिनीने वसतिगृहातच..
crime news : महाविद्यालयात एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची माहिती समोर आली. पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपी हा मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगण्यात येते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलगी मानसिक तणावात असायची
गळफास घेत पीडितेनं जीवन संपवलं
Crime News : ओडिशाच्या जंगाम जिल्ह्यातील इंजीनिअरिंग महाविद्यालयात एका विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची माहिती समोर आली. पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून आरोपीची ओळख विश्वजीत जेना अशी पटली आहे. विश्वजीत जेना हा ओडिशातील परिवहन मंत्री विभूती जेना यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री, आक्षेपार्ह व्हिडिओ मित्रांच्या ग्रुपवर व्हायरल अन्..
'मुलगी मानसिक तणावात असायची'
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी महाविद्यालयात बीसीएच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत होती. तक्रारीनुसार, दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. विद्यार्थिनीच्या मामाने संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, नातेसंबंधात सुरू असलेल्या वाद विवादाला कंटाळून विद्यार्थिनीने जीवन संपवलं, मुलगी मानसिक तणावात असायची. दोघांच्या नातेसंबंधात आलेल्या समस्येमुळे पीडितेनं टोकाची भूमिका घेतली.
गळफास घेत पीडितेनं जीवन संपवलं
विद्यार्थिनीला शनिवारी सकाळी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून गंभीर अवस्थेतून बाहेर काढण्यात आलं. विद्यार्थिनीने गळफास घेतला होता. नंतर तिला एका रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तपास करताना तिला मृत घोषित केले. या घटनेनं परिसर हादरून गेला. या प्रकरणात पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल, लॅपटॉप आणि हॉस्टेल परिसरातील सीसीटीव्हीचा तपास केला. पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणींची चौकशी केली.
दरम्यान, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे एसपी श्रवण विवेक एम यांनी प्रकरणात लक्ष घालत प्रकरणाचा तपास केला. सांगण्यात येतेय की, 'विद्यार्थिनीच्या मामाने केलेल्या तक्रारीवरून आरोपी विश्वजीत जेना विरोधात भारतीय दंड संहिता कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला'.









