पुण्याची सिया इंदूरच्या सोनमसारखीच.. लोहगड, दरी अन्... बॉयफ्रेंडच्या नादापायी केतनला धाडलं यमसदनी!

मुंबई तक

Pune Crime: इंदूरच्या कुप्रसिद्ध सोनम रघुवंशी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या लोहगड किल्ल्यातील केतन अग्रवालच्या मृत्यूने खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांच्या तपासात उघड झाले की, होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने कट रचून ही हत्या घडवून आणली.

ADVERTISEMENT

pune siya goyal is just like sonam she pushed her future husband into a 350 foot deep gorge lohagad murdered ketan agarwal all for sake of her boyfriend
पुण्यातील सियाने होणाऱ्या पतीची केली हत्या
google news

पुणे: इंदूरचे सोनम रघुवंशी प्रकरण लोक विसरलेही नव्हते, तोच पुणे जिल्ह्यातून असेच एक प्रकरण समोर आले. फरक एवढाच होता की, सोनमवर तिच्या हनिमूनदरम्यान नवऱ्याची हत्या केल्याचा आरोप होता, तर इथे लग्नाच्या तयारीदरम्यान, होणाऱ्या पतीला वाढदिवस साजरा करण्यासाठी डोंगरावर नेऊन 350 फूट खोल दरीत ढकलण्यात आले. हा आकस्मिक मृत्यू सुरुवातीला एक अपघात मानला गेला होता, परंतु तपासात या घटनेला एक नवीन वळण मिळाले.

लोहागड किल्ल्यावर 24 वर्षीय केतन अग्रवालचा झालेला मृत्यू सुरुवातीला एक अपघात म्हणून नोंदवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेकिंग करताना फोटो काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो 350 फूट खोल दरीत पडला. कुटुंबीयांना धक्का बसला होता, पण हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे सांगून त्यांची समजूत काढण्यात आली होती. तथापि, पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे चित्र बदलले. मोबाइल रेकॉर्ड, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींची तपासणी केल्यानंतर, पोलीस आता या प्रकरणाला हत्येचा कट म्हणून पाहत आहेत. या तपासाच्या केंद्रस्थानी केतनची होणारी पत्नी, सिया गोयल आणि चेतन चौधरी नावाचा एक तरुण आहे.

पुढच्या महिन्यात होणार होतं लग्न 

केतन अग्रवालच्या आयुष्यात हा आनंदाचा काळ होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याचे लग्न पुढच्या महिन्यात ठरले होते. घरी तयारी सुरू होती, नातेवाईकांना माहिती दिली जात होती आणि भविष्यातील योजना आखल्या जात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने जयपूरमध्ये एका भव्य लग्नाचे नियोजन केले होते. एक अत्यंत आलिशान महालही बुक करण्यात आला होता. पाहुण्यांच्या स्वागताची आणि निवासाची व्यवस्था केली जात होती. सर्वजण लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. लग्नाच्या तयारीच्या ऐन ऐनवेळी केतनच्या मृत्यूची बातमी येईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

हे ही वाचा>> पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही, होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...

वाढदिवस खास बनवण्याची तयारी

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, केतन त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसासाठी खूप उत्सुक होता. 19 जून रोजी तिचा वाढदिवस होता. लग्नाआधी आणि नंतरच्या सोहळ्यांसाठी अनेक योजना आखण्यात आल्या होत्या. एका कुटुंबीयाने सांगितले की, महाबळेश्वरमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या सोहळ्याची तयारी सुरू होती. या सोहळ्यासाठी सुमारे 40 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. याचा अर्थ, एकीकडे लग्नाची तयारी आणि दुसरीकडे वाढदिवसाचा सोहळा सुरू होता. पण या तयारीच्या दरम्यान जे घडले, त्याने संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडले.

हे वाचलं का?