पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही, होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...

मुंबई तक

pune crime news : लोहगड किल्ल्यावर दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले जात असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हे प्रकरण हत्येचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

pune crime news
pune crime news
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही

point

होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन विशाल अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. आतापर्यंत केतन अग्रवाल यांचा तोल जाऊन ते दरीत कोसळल्याने मृत्यू झाल्याचे मानले जात होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण अपघात नसून हत्येचे असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या संशयामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, काही दिवसांपूर्वी दुःखद दुर्घटना म्हणून पाहिले जात असलेले हे प्रकरण आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे. पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो पुढील तीन तास महत्त्वाचे, जोरदार पाऊस बरसणार; अलर्ट जारी

कथितरित्या होणाऱ्या पत्नीनेच केतन यांना धक्का दिल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी केतन अग्रवाल यांच्यासोबत त्यांची होणारी पत्नीही उपस्थित होती. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कथितरित्या होणाऱ्या पत्नीनेच केतन यांना धक्का दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, घटनेपूर्वी दोघांमध्ये काही वाद झाला होता का, तसेच या कथित घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या नव्या घडामोडींमुळे सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंदवलेल्या घटनेकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे.

हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो पुढील तीन तास महत्त्वाचे, जोरदार पाऊस बरसणार; अलर्ट जारी

हे वाचलं का?