आजी आणि नातू रात्री एकत्र दारु प्यायले, सकाळी भयानक घटना उघडकीस

मुंबई तक

एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या आजीची एका नातवाने आणि तिच्या मुलीने मिळून संपवले आहे. बेंगलोरमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

आजी आणि नातू मिळून रात्री एकत्र दारु प्यायले

point

सकाळी भयानक घटना उघडकीस

Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची तिच्याच पोटच्या मुलीने आणि नातवाने दारूच्या नशेत झालेल्या वादातून बॅट आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून हत्या केली आहे. ही घटना घडून गेल्यानंतरही दोन्ही आरोपी मृतदेहाशेजारीच बसून दारू पीत राहिले. या हत्येचा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा नातवाने त्याच्या काकांना फोन करून पैशांची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोरमधील ही घटना आहे.

तिघांनाही दारुचे व्यसन

मिळालेल्या माहितीनुसार, जयम्मा (70) असे मृत वृद्धेचे नाव आहे, तर तिची मुलगी भाग्यलक्ष्मी (49) आणि नातू कुशल (26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण सुभाष नगर येथील 'मोनिषा एन्क्लेव्ह' अपार्टमेंटमध्ये राहत होते. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयम्मा, तिची मुलगी भाग्यलक्ष्मी आणि नातू कुशल या तिघांनाही दारूचे व्यसन होते. घरची कौटुंबिक मालमत्ता विकून मिळालेल्या पैशांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. या पैशांवरून आणि इतर कारणांवरून त्यांच्यात घरात नेहमीच भांडणे होत असत.

हे ही वाचा : बीड: 16 वर्षीय मुलगी दळण आणायला गेली, रस्त्यात गाठून खोलीत नेलं अन् दोनदा..

दारुच्या नशेत वाद

रविवारच्या (21 जून) रात्री या तिघांमध्ये नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा दारूच्या नशेत जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मुलगी भाग्यलक्ष्मी आणि नातू कुशल यांनी मिळून वृद्ध जयम्मा यांच्यावर क्रिकेटची बॅट आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यात जयम्मा गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. क्रूरतेचा कळस म्हणजे हत्येनंतरही दोन्ही आरोपींनी पोलिसांना कळवले नाही. उलट कोणताही पश्चात्ताप न दाखवता ते मृतदेहाशेजारीच घरात बसून दारू पीत राहिले.

हे ही वाचा : केतन अग्रवालची हत्या करणारी सिया गोयल नेमकी आहे तरी कोण?

'असं बाहेर' आलं प्रकरण

सोमवारी आरोपी कुशलने त्याचे काका स्वामी नाईक यांना फोन करून पैशांची मागणी केली. मात्र, हे पैसे दारूवरच उडवले जातील असे सांगून काकांनी पैसे देण्यास नकार दिला. काही वेळाने कुशलने पुन्हा फोन करून आजी जयम्माचा मृत्यू झाल्याचे सांगितले, पण मृत्यू कसा झाला हे लपवून ठेवले. संशय आल्याने स्वामी नाईक यांनी तातडीने अपार्टमेंट गाठले, तेव्हा जयम्मा बाथरूमच्या दरवाजाजवळ रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळल्या. त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिते च्या कलम 103 (हत्येचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 

हे वाचलं का?