केतन हत्याकांडाचा मोठा खुलासा, भोळ्या चेहऱ्याच्या सियाचे 'त्या' तरूणाला तब्बल 2004 कॉल्स
केतनच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी, त्याच्या अंत्यविधीनंतर सिया गोयल त्याच्या घरी आली. संभाषणादरम्यान, केतनच्या बहिणीला सियाच्या उत्तरांवरून संशय आला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास अधिक तीव्र झाला आणि सत्य समोर आलं.
ADVERTISEMENT

पुणे: ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी झालेल्या 26 वर्षीय केतन विशाल अग्रवालच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पुणे पोलिसांचा दावा आहे की, केतनचा मृत्यू हा अपघात नसून एक पूर्वनियोजित हत्या होती. तपासादरम्यान उघडकीस आलेले डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि संशयास्पद हालचालींनी संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून टाकली.
केतनच्या अंत्यसंस्कारानंतर चार दिवसांनी त्याची होणारी पत्नी, सिया गोयल ही केतनच्या कुटुंबाला भेटायला आली तेव्हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा समोर आला. त्यावेळी कुटुंब मोठ्या धक्क्यात होते. पण संभाषणादरम्यान, सियाच्या काही उत्तरांवरून केतनच्या बहिणीला संशय आला. तिला वाटले की, घटनेबद्दलचे संपूर्ण सत्य उघड होत नाहीये. कुटुंबाने व्यक्त केलेल्या या संशयामुळे पोलीस तपासाला एक नवीन दिशा मिळाली.
जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली. त्यातून असे उघड झाले की 1 जानेवारी ते 1 जून दरम्यान, ते दोघे 2004 वेळा बोलले होते. पोलिसांच्या मते, गेल्या सहा महिन्यांत ते अंदाजे 238 तास फोनवर बोलले होते. या दीर्घ आणि सततच्या संभाषणाने तपास यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले.
बहिणीला संशय अन् सत्य आलं समोर
पोलीस तपासात 18 जूनच्या घडामोडींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तपास अधिकाऱ्यांच्या मते, घटनेच्या दिवशी चेतन चौधरीचे इंटरनेट सकाळी 7 ते सायंकाळी 5.40 पर्यंत बंद होते. पोलिसांनी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानून त्याच्या हालचालींची सखोल चौकशी सुरू केली.









