Govt Jobs : विधी शाखेतील पदवीधरांसाठी मोठी संधी, SBI मध्ये भरती सुरु, लगेच करा अर्ज

मुंबई तक

विधी शाखेतील पदवीधरांसाठी SBI मध्ये नोकरीची संधी चालून आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जुलै आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

SBI Recruitment
SBI Recruitment
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : विधी शाखेतील पदवीधरांसाठी मोठी संधी

point

SBI भरती सुरु

point

लगेच करा अर्ज

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत SCO पदांच्या एकूण 84 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे कायदेशीर आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना बँकेत नामांकित पदांवर काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संपूर्ण भारतातील विविध शाखांमध्ये या नियुक्त्या केल्या जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.

पात्रतेचे निकष

या भरतीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या पदांचा समावेश आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर (Law) पदाच्या 20 जागा आणि डेप्युटी मॅनेजर (Law) पदाच्या 29 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II) पदासाठी 35 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विधी शाखेतील (LLB) पदवी पूर्ण केलेल्या आणि संबंधित क्षेत्रात 2 ते 4 वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना लॉ ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करता येईल, तर एमबीबीएस (MBBS) पदवीसह किमान 5 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर्स मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी पात्र ठरतील.

हे ही वाचा : अशोक चव्हाणांची 'ती' पोस्ट अन् नेटकरी तुटून पडले, कमेंट्समध्ये बेधडक सवाल

वयोमर्यादा

वयोमर्यादेचा विचार केल्यास, 31 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय निश्चित केले जाईल. असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर या दोन्ही लॉ पदांसाठी वयोमर्यादा 25 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावी, तर बँक मेडिकल ऑफिसर पदासाठी जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली असून, अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट लागू राहील.

हे ही वाचा : नवरा बाहेर असताना 'तो' महिलेसोबत फ्लॅटमध्ये.., शेवटी सूरजने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

'इथे' करा अर्ज

या भरतीसाठी जनरल, ईडब्ल्यूएस (EWS) आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक शैक्षणिक आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रांसह अंतिम मुदतीपूर्वी, म्हणजेच 14 जुलै पूर्वी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी sbi.bank.in या वेबसाईटला भेट द्यावी.
 

हे वाचलं का?