अशोक चव्हाणांची 'ती' पोस्ट अन् नेटकरी तुटून पडले, कमेंट्समध्ये बेधडक सवाल

मुंबई तक

Ashok Chavan facebook post : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट करत आणीबाणी म्हणजे लोकशाही आणि संविधानाची हत्या होती, असं म्हटलंय. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात..

ADVERTISEMENT

Ashok Chavan
Ashok Chavan
google news

बातम्या हायलाइट

point

अशोक चव्हाणांची 'ती' पोस्ट अन्

point

नेटकरी तुटून पडले, कमेंट्समध्ये बेधडक सवाल

Ashok Chavan on Emergency  : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालीये. या पोस्टमधून त्यांनी 1975 ते 1977 या काळात इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात भाष्य केलंय. 25 जून हा संविधान हत्या दिवस असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकांचा आवाज दाबणे म्हणजेच लोकशाहीची हत्या असल्याचंही ते म्हणाले आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांची ही पोस्ट नेटकऱ्यांना पसंत पडलेली नाही. "1975 ते 1977 याच काळात तुमचे वडील काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. 25 जून 1975 रोजी आपले वडील मुख्यमंत्री होते मग त्यांनी पण संविधानाची हत्या केली का?", असं म्हणत नेटकऱ्यांनी अशोक चव्हाणांना बेधडक सवाल केले आहेत.

हेही वाचा : “धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार", अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?

अशोक चव्हाण यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

"लोकशाहीचा श्वास आणि संविधानाचा पाया मजबूत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आज आपण सर्व मिळून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प करूया", आणिबाणीची आठवण करत अशोक चव्हाण यांनी या ओळी शेअर केल्या आहेत. शिवाय, त्या काळात लोकांचा आवाज कशा पद्धतीने दाबण्यात आला होता? याबाबतचा एक फोटो देखील त्यांनी पोस्ट केलाय. मात्र, अशोक चव्हाण यांनी ही पोस्ट करताच नेटकऱ्यांनीकडून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. 

हेही वाचा : 20 तास काम, जनावरांचं खाद्य अन् मृत्यू, 'या' 12 कामगारांसोबत मालकाने काय केलं?

हे वाचलं का?