नवरा बाहेर असताना 'तो' महिलेसोबत फ्लॅटमध्ये.., शेवटी सूरजने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

मुंबई तक

Crime News : भागलपूरमध्ये विवाहित महिलेसोबत राहत असलेल्या तरुणाने तीन मजली इमारतीवरून उडी मारून जीव दिल्याची घटना घडली. या प्रकरणात मृताच्या भावाचा कटा रचल्याचा आरोप केलाय. यामुळे पोलिस तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा बाहेर असताना शेजारी महिलेसोबत फ्लॅटमध्ये..,

point

शेवटी सूरजने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

Crime News : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरखीकल परिसरात एका तरुणाने तीन मजली इमारतीवरून उडी मारून जीव दिल्याची घटना घडली. मृत तरुणाची ओळख सूरज कुमार अशी झाली असून, तो गेल्या पाच वर्षांपासून आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत राहत होता. सुमारे 30 फूट उंचीवरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने ही आत्महत्या असल्याचा दावा केला आहे, तर मृताच्या भावाने ही नियोजित कटाची घटना असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हेही वाचा : जैन समाजाकडून राज ठाकरेंना लेखी माफीनामा, शिवतीर्थवर काय घडलं?

सूरजने कशामुळे उचलले टोकाचे पाऊल?

माहितीनुसार, सूरज कुमार हा नेहा नावाच्या विवाहित महिलेसोबत सुरखीकल येथील एका फ्लॅटमध्ये राहत होता. महिलेचा पती दुसऱ्या राज्यात नोकरी करत असून ती आपल्या मुलांसोबत येथे राहत होती. नेहा हिने सांगितले की, सूरजला मद्यपानाचे व्यसन होते. तो आदल्या दिवशीही मद्यधुंद अवस्थेत आला होता आणि घराची चावी मागत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीही त्याने मद्यपान केले होते. तो फ्लॅटमध्ये आला तेव्हा ती आणि तिची मुलगी आंघोळ करून कपडे बदलत होत्या. त्याचवेळी सूरज खिडकीजवळ गेला आणि अचानक खाली उडी मारली. त्यांच्यात कोणताही वाद झाला नव्हता. उलट तो यापुढे मद्यपान करणार नसल्याचे सांगत होता. नेहाने असा दावा केला की, त्याने अतिमद्यपान आणि तिने दिलेल्या सल्ल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असावे. तसेच सूरजच्या कुटुंबीयांना तो तिच्यासोबत राहत असल्याची माहिती होती, असेही तिने म्हटले.

हेही वाचा : “धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार", अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?

हे वाचलं का?