सासऱ्यासह चार बहिणींनी मिळून दाजीचं डोकंच ठेचलं.. थरकाप उडवेल अशी घटना!

मुंबई तक

Crime News : साक्षी नावाच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह केला. विवाह केलेल्या तरुणाचे नाव विष्णू यादव असे आहे. दोन वर्षांपूर्वी साक्षी सिंग आणि विष्णू यादव यांनी एका अपत्याला जन्म दिला, नंतर त्यांच्यातील वाद सुरु झाला आणि पुढे होत्याचं नव्हतं होऊन बसलं. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

जावई विष्णुच्या डोक्यावर वारंवार हल्ला

point

मृताच्या वडिलांनी सांगितली मनातली सल

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊच्या आशियाना भागातील सेक्टर 1 मध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. एका साक्षी नावाच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह केला. विवाह केलेल्या तरुणाचे नाव विष्णू यादव असे आहे. दोन वर्षांपूर्वी साक्षी सिंग आणि विष्णू यादव यांनी एका अपत्याला जन्म दिला, नंतर त्यांच्यातील वाद सुरु झाला आणि पुढे होत्याचं नव्हतं होऊन बसलं. 

हे ही वाचा : लेह लडाखहून घरी परतताना 30 फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात, पुण्यातील 3 जिवलगांचा करुण अंत

जावई विष्णुच्या डोक्यावर वारंवार हल्ला

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जावई विष्णू यादव हा काही कामानिमित्त घरी आला होता. त्याचा सासरे आणि नणंदेशी वाद झाला होता, नंतर वादाचे मारहाणीत रुपांतर झाले होते. संतप्त झालेल्या सासरच्या मंडळींनी पलंगाचे पाय खेचून विष्णुच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला. यामुळे त्याच्या कवटीला मोठा मार लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. 

चार बहिणींनी मिळून विष्णूवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप

संबंधित प्रकरणात पोलिसांनी साक्षी सिंगच्या चार बहि‍णींना ताब्यात घेतले होते. संबंधित प्रकरणातील असा आरोप की, चौघांनी मिळून मिळून विष्णूच्या डोक्यात प्राणघातक हल्ला केला. यामध्ये साक्षीचा मोठा हात असल्याची चर्चा आहे. या मारहाणीत मोठी बहीण, राधा, रत्ना आणि ज्योती यांचा समावेश आहे. 

मृताच्या वडिलांनी सांगितली मनातली सल

पतीच्या निधनानंतर साक्षी सिंग यांची अवस्थाही खूप वाईट आहे. त्यांना मोठा धक्का बसला, सध्या त्यांची कोणाशीही बोलण्याची स्थिती नाही. दरम्यान, या प्रकरणात मयत तरुण विष्णू यादव यांचे वडील छेदी लाल यांनी सांगितलं की, सासरचे लोक नाखूश होते. ते वारंवार शिवीगाळ करायचे आणि जीवे मारण्याची धमकी देखील देत होते. 

हे वाचलं का?