सोलापूर : जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड, मध्यरात्री घरात घुसून पुतण्यांकडून काका-काकीची निर्घृण हत्या
solapur crime : सोलापूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन भाच्यांनी मिळून आपल्याच काका आणि काकीची उशीने तोंड दाबून हत्या केली. या प्रकरणात सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाची माहिती मिळवून दुहेरी हात्याकांड उघडकीस आणलं. संबंधित प्रकरणात 24 तासांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन्ही आरोपी पुतणे घरात शिरले आणि काका काकींना संपवलं
प्रकरण चोरीचं वाटावं म्हणून दोघांनीही चोरी केल्याचा बनाच रचला
Solapur Crime : सोलापूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन भाच्यांनी मिळून आपल्याच काका आणि काकीची उशीने तोंड दाबून हत्या केली. या प्रकरणात सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाची माहिती मिळवून दुहेरी हात्याकांड उघडकीस आणलं. संबंधित प्रकरणात 24 तासांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या वृद्ध दाम्पत्यांचं नाव महादेव मंचल आणि रंगम्मा मंचल असे आहे.
हे ही वाचा : दहावीची परीक्षा सुरु असताना शिक्षकाने सात विद्यार्थीनींशी केले अश्लील कृत्य, परीक्षेदरम्यान परिसरात गदारोळ
दोन्ही आरोपी पुतणे घरात शिरले आणि काका काकींना संपवलं
वृद्ध दाम्पत्य हे सोलापुर येथील कृष्णानगर परिसरात राहत होते. महादेव मंचलला पॅरलिसिसचा झटका आला असल्याने ते अंथरुणाशीच खिळून होते. पुतणे राहुल रामचंद्र मंचल आणि विकास रामचंद्र मंचल यांचा जमिनीवरून वाद होता. वादानंतर दोघांनी मिळून काका काकींची हत्या केली. मध्यरात्री दोन्ही आरोपी घरात घुसले आणि त्यांनी आपल्याच काका-काकींचे तोंड उशीने दाबून तिची हत्या केली.
प्रकरण चोरीचं वाटावं म्हणून दोघांनीही चोरी केल्याचा बनाच रचला
हत्येनंतर संशयपासून लपण्यासाठी दोघांनी घरात चोरी केल्याचे नाटक केल्याचा बनाव रचला, ज्यामुळे हे प्रकरण चोरीचं वाटावं. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांचे कुटुंबीयांच्या हालचालीवर संशय होता. त्यांनी तपास सुरु केला आणि राहुल आणि विकास यांना ताब्यात घेतलं, नंतर चौकशीदरम्यान दोघांनीही आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला.
हे ही वाचा : भिवंडीतील 15 वर्षीय आदिवासी मुलीचे अपहरण, लग्नाचे आमिष दाखवत बीडमधील वृद्धाला विकले, नंतर शेतात नको तेच...
पोलिसांच्या तपासातून मालमत्तेचा जुना वाद उघड झाला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी, याच मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये भांडण देखील झाले होते. आरोपींनी संपूर्ण मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात सोलापूर एमआयडीसी पोलीस राहुल रामचंद्र मंचल आणि विकास रामचंद्र मंचर या दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत अटक केली. या घटनेनं सोलापूर शहर हादरून गेले आहे.










