मामीसोबत अनैतिक संबंध... बहिणीसोबत लग्न आणि सासू-मेव्हण्याची हत्या, पार चक्रावून टाकणारी कहाणी

मुंबई तक

Murder and Police Encounter: मामीसोबत अनैतिक संबंध असणाऱ्या अफसर खान याने आपल्या सासू आणि मेव्हण्याची दोन दिवसांपूर्वी हत्या केली होती. ज्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अफसर खान याला ठार करण्यात आले.

ADVERTISEMENT

uncle murdered over illicit affair with aunt mother in law and brother in law killed married with own sister who is afsar khan who killed in an encounter
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक
social share
google news

बरेली: उत्तर प्रदेशातील बरेली येथे सासू आणि मेहुण्याची हत्या करून फरार झालेला अफसर खान मंगळवारी (17 मार्च) सकाळी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. अफसर खानला त्याच्या किशोरवयापासूनच गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती. त्याने मामीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे थेट मामाची हत्या केली होती. त्या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता. तर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्याने आपल्या चुलत बहिणीशी जबरदस्तीने लग्नही केले होते. त्याचे कुटुंबही त्याच्या भीतीने जगत होते. सासू आणि मेहुण्याची हत्या करताना त्याने आपल्या पत्नीवरही चाकूने वारंवार वार केले होते. सध्या त्याची पत्नी आयसीयूमध्ये दाखल आहे.

कुटुंबीयांनी खुलासा केला की, 2004 मध्ये अफसर खानचे त्याच्या मामीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावेळी अफसर खान सुमारे 16 वर्षांचा होता. याच संबंधातून त्याने आपल्या मामीसोबत मिळून मामाची गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात अफसर आणि त्याच्या मामीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 2016 मध्ये अपीलवर त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि तो गावात परतला, जिथे तो एक गुंड बनला. मात्र, या घटनेनंतर सर्वजण त्याला घाबरू लागले. मग त्याने शेजारी राहणाऱ्या त्याची चुलत बहीण सायमा हिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

कुटुंबाने याला विरोध केला, पण त्याने त्यांना जुमानलं नाही आणि मे 2017 मध्ये त्याने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. मात्र, अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तो सायमाला वारंवार मारहाण करत असे. परिणामी, 2022 मध्ये त्याच्यावर हुंडा छळाचा गुन्हा दाखल झाला, पण त्याने सायमाची समजूत काढली होती.

सासू आणि मेव्हण्याची हत्या

आपल्या मेव्हण्याची आणि सासूची हत्या करणाऱ्या अफसर खानने हा गुन्हा पूर्वनियोजित पद्धतीने केला. बैठकीत उपस्थित असलेला या घटनेचा प्रत्यक्षदर्शी यासीन म्हणाला की, त्याने पूर्ण नियोजन करून चाकू आणला होता. पण त्याचा हेतू कोणालाच कळला नाही, कारण यावेळी त्याने ईदच्या सणाचे कारण देत आपल्या पत्नीला हे प्रकरण मिटवण्यास सांगितले होते. बोलता बोलता अफसरने आपल्या पत्नीला धमकी दिली की, जर ती त्याच्यासोबत राहिली नाही, तर तो तिला ठार मारेल. त्यावेळी त्याच्या मेव्हण्याने त्याला विरोध केला. ज्यामुळे संतापलेल्या अफसरने चाकूने हल्ला केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp