हिंगोली : 69 वर्षीय वृद्धाचा 9 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार! पीडितेला चॉकलेट खायला दिलं अन्...
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. हिंगोलीतील एका 69 वर्षीय पुरुषाने 9 वर्षीय मुलीला चॉकलेट खायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. घाबरलेल्या मुलीने हा संपूर्ण प्रकार आईला सांगितल्यानंतर ह्या घटनेचा उलगडा झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे हिंगोलीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
69 वर्षीय वृद्धाचा 9 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार!
पीडितेला चॉकलेट खायला दिलं अन्..
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. हिंगोलीतील एका 69 वर्षीय पुरुषाने 9 वर्षीय मुलीला चॉकलेट खायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. घाबरलेल्या मुलीने हा संपूर्ण प्रकार आईला सांगितल्यानंतर ह्या घटनेचा उलगडा झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे हिंगोलीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा : बीड: बनावट नोटांचे केज कनेक्शन! चक्क माजी सरपंच अडकला तामिळनाडूतील बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये...
चॉकलेट आणि पैसे देऊन केले अत्याचार
अल्पवयीन पीडितेचे पालक आरोपीच्या शेतात रोजंदारीवर काम करतात. 28 तारखेला सकाळी 9 वर्षीय पीडिता शाळेत जात होती. त्यादरम्यान, आरोपीने तिला एकटी जाताना पाहून तिला काही चॉकलेट आणि पैसे दिले. त्यानंतर तिला घरी येण्यास सांगितले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर, घाबरलेल्या मुलीने तिच्या आईला तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. तिच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून आई घाबरली.
वडिलांनी दाखल केली तक्रार
आईने मुलीच्या वडिलांना या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने काल रात्री कळमनुरी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी संतुकराव आवटे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हेगाराला अटक केली.