सातारा : प्राध्यापकाचे तरुणीला अश्लील मेसेज, नंतर शरीरसुखाची मागणी, लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Satara crime : सातारा जिल्ह्यातील उंब्रजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्षकाने विद्यार्थीनीला सोशल मीडियाद्वारे अश्लील मेसेज करून शरीरसुखाची मागणी केली. या घटनेनं शाळेतील परिसर आणि उंब्रज हद्दीत एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.

ADVERTISEMENT

Satara crime
Satara crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थीनीच्या असुरक्षितेत वाढ

point

प्राध्यापकाकडून पीडितेला मोबाईलवरून अश्लील मेसेज

Satara Crime : सकलेन मुलाणी - सातारा जिल्ह्यातील उंब्रजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राध्यापकाने विद्यार्थीनीला सोशल मीडियाद्वारे अश्लील मेसेज करून शरीरसुखाची मागणी केली. या घटनेनं शाळेतील परिसर आणि उंब्रज हद्दीत एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध उंब्रज पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध मंगळवारी 17 मार्च रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : लात्कार प्रकरणातील आरोपी ज्योतीषाने स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक, अंधारेंचे सनसनाटी आरोप

विद्यार्थीनीच्या असुरक्षितेत वाढ

या घटनेनं आता विद्यार्थीनीच्या असुरक्षितेत वाढ होऊ लागली आहे. शाळा, तसेच विद्यालयात प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतो, पण प्राध्यापकाच्या अशा कृत्याने शिक्षकवृंदाची प्रतिमा मलिन झाल्याचं चित्र आहे. या प्रकरणातील आरोपी प्राध्यापकाचं नाव समोर आलं आहे. धनाजी तानाजी सावंत राहणार पाप्री, तालुका मोहोळ आणि जिल्हा सोलापूर अशी ओळख आहे. 

शिक्षक धनाजी सावंतकडून पीडितेला मोबाईलवरून अश्लील मेसेज

प्राध्यापक धनाजी सावंत यांनी 12 मार्च रोजी एका पीडितेला मोबाईलवरून अश्लील मेसेज केले होते. नंतर तिला शरीरसुखाची मागणी देखील केली होती. या घटनेची माहिती पीडितेनं कुटुंबीयांना दिली होती. कुटुंबीयांनी थेट पोलीस उंब्रज ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत

संबंधित प्रकरणात पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाछी पोलीस उपनिरिक्षक रमेश ठाणेकर करत असल्याची माहिती आहे. या लाज आणणाऱ्या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.    
 

हे वाचलं का?

    follow whatsapp