शिरुर : समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे हत्या झाल्याचा संशय, 6 वीच्या विद्यार्थ्याचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

मुंबई तक

Pune Crime News : शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून समलिंगी संबंधांच्या विरोधातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संताप आणि खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिरुर : समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे हत्या झाल्याचा संशय

point

6 वीच्या विद्यार्थ्याचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साई मांजरे असे मृत मुलाचे नाव असून तो तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता.मृत मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        

समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे हत्या करण्यात आल्याचा संशय
         
प्राथमिक माहितीनुसार, समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. घटना मांजरे वस्ती परिसरात घडली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा मृत्यू नेमका हत्या आहे की अन्य काही कारण, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. 

आम्ही मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? संतप्त ग्रामस्थांचा सवाल 

वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, “12 तासांच्या आत आरोपींना अटक झाली नाही तर मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय, अशा घटना वारंवार घडत असतील तर आम्ही मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. विशेष म्हणजे, याच परिसरात दीड ते दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे. या प्रकरणाचा तातडीने सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp