दाढी खाजवून आदित्य ठाकरेंनी खिजवलेलं, 24 तासाच्या आतच एकनाथ शिंदेंनी फिरवला गेम! वाचा Inside Story
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पण अवघ्या काही तासात शिंदेंनी गोकुळ गीते यांनाच आपल्या बाजूने वळवून घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
ADVERTISEMENT

नाशिक: नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गीते यांनी अत्यंत अनपेक्षितरित्या पराभव करत विजयाचा गुलाल उधळला होता. या विजयानंतर राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, भाजपच्या छुप्या पाठिंब्याच्या आधारावर गोकुळ गीते यांनी हा विजय मिळवला आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपनेच शिंदेंच्या शिवसेनेला नाशकात शह दिला. याच घडामोडीबाबत जेव्हा शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरे यांनी थेट दाढी खाजवत एकनाथ शिंदेंना खिजवलं होतं. पण या टीकेला काही तास होत नाही तोच एकनाथ शिंदेंनी सगळा गेम फिरवला.
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना खिजवलेलं
नाशिक विधान परिषद निकालानंतर शिवसेना UBT आमदार आदित्य ठाकरे यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट दाढी खाजवत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना खिजवलं होतं. पाहा नेमकं काय म्हणालेले आदित्य ठाकरे..
प्रश्न: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय.. काय सांगाल?
आदित्य ठाकरे: या प्रश्नानंतर आदित्य ठाकरेंना आपलं हसू आवरलं नाही.. यावेळी एकनाथ शिंदेंना डिवचत आदित्य ठाकरे असंही म्हणाले की, हसता-हसता बोलता येत नाहीए.









