ज्याने शिवसेनेला हरवलं त्यालाच शिंदेंनी तासाभरात फोडलं? 'जायंट किलर'साठी शिंदेंकडून भलतंच ऑपरेशन!

मुंबई तक

नाशिक विधान परिषद निवडणुकीत ज्या अपक्ष गोकुळ गीते यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केलं त्याच गीतेंना शिवसेनेत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न शिंदेंकडून सुरू झाले आहेत.

ADVERTISEMENT

nashik mlc election independent candidate gokul gite defeated shiv sena candidate yet eknath shinde offered him entry into shiv sena within just an hour shinde arranged a special flight for giant killer after election result
शिवसेनेने गोकूळ गीतेंसाठी पाठवलं खास विमान
google news

प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांतच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडल्याचे समोर आले आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. मात्र, निकाल लागल्यानंतर काही तासांतच गीते हे शिवसेनेच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दराडेंचा पराभव, महायुतीवर विश्वासघाताचे आरोप

एकीकडे विधान परिषद निवडणुकीत पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीतील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. महायुतीमधील काही घटकांनी विश्वासघात केल्यामुळेच पराभवाला सामोरे जावे लागल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण आणखी तापले होते.

विशेष म्हणजे, निवडणुकीच्या काळात गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिवसेनेकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले होते. मात्र गीते यांनी माघार घेण्यास नकार दिलेला आणि अखेर त्यांनी निवडणुकीत विजय मिळवत दराडेंना मोठा धक्का दिला होता. असं असतानाही निकालाच्या अवघ्या काही तासात शिवसेनेकडून गोकुळ गीते यांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाले.

विजयानंतर तात्काळ विशेष विमानाची व्यवस्था

निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 3 ते 4 तासांतच आणखी एक मोठी घडामोड घडली. गोकुळ गीते यांच्यासाठी शिवसेनेकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?